आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA World Cup 2014 Record Goals News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यावेळी FIFA वर्ल्ड कपमध्ये GOAL चा विक्रम रचला जाण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझील - फुटबॉल विश्वचषकाच्या पहिल्या 15 सामन्यांमध्येच 47 गोल झाले आहेत. ही सरासरी प्रत्येक सामन्यात 3.14 गोल एवढी आहे. म्हणजेच दर अर्ध्या तासाला एक गोल एवढी सरासरी होते. 1958 नंतरची ही सर्वात अधिक सरासरी आहे. त्यावेळी 126 गोल झाले होते, आणि सरासरी होती 3.6 गोल. गेल्या वर्ल्डकपमध्ये ही सरासरी 1.64 एवढी होती.

काय आहेत कारणे?
आक्रमकता वाढली..
फुटबॉलच्या खेळात मोठ्या प्रमाणात आक्रमकता वाढली आहे. जवळपास प्रत्येक संघामध्येच उत्कृष्ट असे फॉरवर्ड- मिडफील्डर आहेत. पण चांगले डिफेंडर मात्र मोजक्याच संघात आहेत. 2007 च्या एका सर्व्हेक्षणानुसार टॉप 30 फुटबॉलपटूंमध्ये 10 डिफेंडर होते. 2014 च्या अशाच एका सर्व्हेक्षणात हा आकडा 30 पैकी केवळ 4 वर आला होता. त्यामुळे गोल अधिक होणार हे स्पष्टच आहे.

सरासरी गोल
स्पर्धा 2006-10 2010-14
प्रिमियर लीग 2.58 2.79
ला लीगा 2.67 2.78
बुंदेसलीगा 2.82 2.96
सीरी ए 2.58 2.61

पुढे वाचा - या विश्वचषकात का वाढले गोल