आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA World Cup 2014 : Switzerland Win 3 0 On Honduras

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिकचे अर्धशतक, स्विसच्या शकिरीने केली वर्ल्डकपमधील 50 वी हॅट्ट्रिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनौस - जेरदान शकिरीने (6, 31, 71 मि.) केलेल्या गोलच्या बळावर फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एका नव्या विक्रमी नोंद झाली आहे. त्याने गुरुवारी मध्यरात्री होंडुरासविरुद्ध सामन्यात गोलची हॅट्ट्रिक केली. वर्ल्डकपच्या इतिहासातील ही 50 वी हॅट्ट्रिक झाली.
शकिरीने केलेल्या गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने होंडुरासविरुद्ध 3-0 अशा फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली. या विजयासह स्विसने स्पर्धेच्या अंतिम 16 मधील आपले स्थान निश्चित केले. लढतीत तीन गोल करणारा शकिरी सामनावीरचा मानकरी ठरला.
स्वित्झर्लंडने आता दोन विजयांसह आपल्या गटात सहा गुणांची कमाई केली. आता नॉकआऊटमध्ये स्वित्झर्लंडचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. फ्रान्सविरुद्ध लढतीतील पराभवातून सावरलेल्या स्वित्झर्लंडने पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले. फ्रान्सने हा सामना 5-2 ने जिंकला होता.
होंडुरासविरुद्ध लढतीत सुरुवातीपासूनच स्वित्झर्लंड टीमला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, होंडुरासने प्रतिस्पर्धी टीमला इतक्या सहजासहजी विजय मिळवून दिला नाही. त्यामुळे शर्थीची झुंज देत स्वित्झर्लंडने सामना जिंकला.

सामन्यात खासकरून स्विसच्या मिडफील्डर जेरदान शकिरीने शानदार कामगिरी केली. त्याने सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला आपल्या हॅट्ट्रिकच्या मोहिमेचा शुुभारंभ केला. याशिवाय त्याने स्विसला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. दरम्यान, होंडुरासने लढतीत बरोबरी साधण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, स्विसच्या गोलरक्षकाने हा प्रयत्न शेवटपर्यंत यशस्वी होऊ दिला नाही. 31 व्या मिनिटाला पुन्हा एकदा शकिरीने होंडुरासच्या गोलरक्षकाला हुलकावणी देण्यात यश मिळवले. त्याने गोल करून मध्यंतरापूर्वीच संघाच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. पिछाडीवर पडलेल्या होंडुरासने दुसर्‍या हाफमध्येही पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, स्विसने सामन्यावरची पकड घट्ट केली होती.
स्विसच्या ‘अल्पाइन मेसी’ची जादू
‘अल्पाइन मेसी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंडच्या शकिरीने होंडुरासविरुद्ध सामन्यात गोलची जादू केली. या 22 वर्षीय खेळाडूने केलेल्या चत्मकारिक कामगिरीच्या बळावर होंडुरासविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला. त्याने करिअरमध्ये 36 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावे 22 गोलची नोंद आहे.

फ्रान्स-इक्वेडोर लढत अनिर्णीत
रिओ दी जानेरिओ - फिफा विश्वचषकात गुरुवारच्या मध्यरात्री फ्रान्स आणि इक्वेडोरच्या संघांदरम्यान खेळल्या गेलेली लढत 0-0 ने बरोबरीत सुटली. दोन्ही संघांनी पहिल्या हाफमध्ये बचावात्मक खेळाला प्राधान्य दिले. मात्र, दुसर्‍या हाफमध्ये दोन्हीकडून आक्रमण वाढले.
इक्वेडोरच्या खेळाडूंनी फ्रान्सच्या गोलपोस्टवर तब्बल 11 वेळा तर फ्रान्सच्या खेळाडूंनी इक्वेडोरच्या गोलपोस्टवर तब्बल 13 वेळा हल्ला चढवला. निर्धारित वेळेत सामन्याचा निकाल न लागल्यामुळे अतिरिक्त वेळेचा आधार घेण्यात आला होता.

इराणचा पराभव; बोस्निया विजयी
साल्वाडोर - बोस्निया हर्जेगोव्हिनाच्या संघाने बुधवारी रात्री इराणचा 3-1 ने पराभव करत विश्वचषकात पहिल्या विजयाची नोंद केली. सामन्याच्या 23 व्या मिनिटाला जेकोने हा गोल केला. जॅनिकने 59 व्या मिनिटाला गोल करून आघाडी 2-0 वर नेऊन पोहोचली. 82 व्या मिनिटाला इराणच्या घुचनेहादने गोल करून सामना 2-1 अशा स्थितीत आणून ठेवला. त्यानंतर एका मिनिटातच बोस्नियाच्या ए.साजेव्हिकने गोल करून संघाला 3-1 ने विजय मिळवून दिला. यासह बोस्नियाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये समाधान कामगिरी केली.
छायाचित्र - गोल केल्यानंतर जल्लोष करताना स्वित्झर्लंडचा स्टार मिडफील्डर जे. शकिरी.