आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA World Cup 2014 : Switzerland Win 3 0 On Honduras, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC: शाकीरीच्‍या हॅट्रिकने स्वित्झर्लंड अंतिम-16 मध्ये, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनूस- 20 व्या वर्ल्डकपमध्ये जेर्डन शाकीरी च्या शानदार हॅट्रिकने स्वित्झर्लंडने होंडूरसला 3-0 ने हुलकावणी देत अंतिम-16 संघात प्रवेश मिळवला आहे. तसेच ग्रुप-ई मध्ये फ्रान्सच्या नंतर दुस-या क्रमांकावर आहे.
फ्रान्स 7 गुणांनी पहिल्या क्रमांकावर होता, तर होंडूरस 6 गुणांनी दुस-या क्रमांकावर होता. इक्वॅडोर 4 गुणांसह तिस-या क्रमांकावर आहे. होंडूरसला लीगच्या तिन्ही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. आता तो अंतिम क्रमांकावर आहे.

टूर्नामेंटची दुसरी हॅट्रिक जेर्डच्या नावावर
यावेळच्या टूर्नामेंटमध्ये जेर्डन शाकीरी हॅट्रिक करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी 17 जूनला जर्मनीच्या म्युलरने पोर्तुगालविरूद्ध तीन गोल केले होते. त्या सामन्यात जर्मनीने पोर्तुगालला 4-0ने पराभूत केले होते. सामन्याच्या फर्स्ट हाफमध्ये जेर्डनने बॉल जाळीत टाकत, स्वित्झर्लंडला होंडूरसच्या विरोधात 1-0 ने बढत मिळवून दिली होती. 31 व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल केला.

होंडूरसच्या बचावफळीचा उडवला धुव्वा
गोलचं अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करणा-या होंडुरसच्या खेळाडूंना धक्काच बसला जेव्हा जेर्डनने आपल्या खात्यात तिसरा गोल लगावत हॅट्रिक पूर्ण केली. हा गोल 71व्या मिनिटाला करण्यात आला होता. होंडूरसचे खेळाडू जेर्डनसमोर अक्षरशः हतबल झाले होते.
फोटोओळ - गोलसाठी जोरदार किक लगावताना जेर्डन शाकीरी (लाल टी-शर्ट)
पुढच्या स्लाइड्सवर पाहा सामन्याचे काही निवडक फोटोज्...