आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fifa World Cup, Lionel Messi News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : फुटबॉलमधील वातावरण \'मेसीमय\', ज्‍याच्‍या त्‍याच्‍या तोंडी फक्‍त मेसीच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोनाल्‍डो आणि मेसी म्‍हणजे 'वन मॅन आर्मी'. आपल्‍या अफलातून शैलीतून कधी गोल झळकावतील आणि प्रतिस्‍पर्धी संघाला मात देतील हे कधीच सांगता येत नाही. रोनाल्डो म्हणजे पोर्तुगाल आणि मेसी म्हणजे अर्जेटिना असे समीकरण विश्वचषकाआधीपासून चर्चेत आहे. रोनाल्डो स्वबळावर पोर्तुगालला यश मिळवून देऊ शकलेला नाही, परंतु मेस्सीने अर्जेटिनाला बाद फेरीत स्थान मिळवून दिले आहे.
दोघांमध्‍येही ठासून प्रतिभा भरलेली आहे. फीफा 2014 मधील 'गोल्‍डन बुटा'चा मानकरी रोनाल्डो किंवा मेसीच असणार असे चाहते अंदाज वर्तवत होते. मात्र रोनाल्‍डोचा पोर्तुगाल बादफेरीत पोहोचू शकला नाही. याऊलट मेसीच्‍या दमदार गोलवर अर्जेंटिना बादफेरीत पोहोचले आहे. त्‍यामुळे मेसीच्‍या चाहत्‍यांना उत्‍साहाचे भरते आले असणार.
मॅराडोना, पेले यांच्याकडे जगाला दाखवण्यासाठी विश्वचषक आहे. मात्र माझ्याकडे तो नाही़, अशी खंत मेसीने बोलून दाखवली होती. ही खंत दूर करण्याचा मेस्सीचा पुरेपूर प्रयत्न असेल. पण तत्‍पूर्वी तरी वातावरण मेसीमय झाली आहे.