आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचव्या किताबावर असेल इटलीची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार वेळचा माजी चॅम्पियन इटलीचा संघ यंदाच्या वल्र्डकपमध्ये किताब जिंकण्यासाठी मैदानावर उतरण्यास सज्ज झाला आहे. सिजर प्रनडेलीचा संघ उत्कृष्ट डावपेचासाठी ओळखला जातो. मात्र, या टीमला विजेतेपद जिंकण्यासाठी मागील वल्र्डकपमधील विजयाच्या आठवणींना उजाळा द्यावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्डकपमध्ये इटलीचा संघ चषकावरचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सहभागी झाला होता. मात्र, या टीमवर विजय न मिळवताच स्पर्र्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली होती.

इटलीने आतापर्यंत चार वेळा वर्ल्डकप (1934, 1938, 1982, 2006) जिंकला आहे. यापेक्षा सर्वाधिक पाच किताब ब्राझीलच्या टीमने जिंकले आहेत. त्यामुळेच यंदाची स्पर्धा जिंकल्यानंतर इटली संघ विजेतेपद मिळवण्यात ब्राझीलच्या विक्रमाची बरोबरी साधणार आहे.

इटली टीमचा व्यवस्थापक सिजर हा चतुर डावपेच आणि कडक शिस्तीसाठी ओळखला जातो. मैदानाच नव्हे तर खेळाडूंच्या बाहेरील वर्तनावरही त्याची खास नजर असते. त्याचा संघ 2012 मध्ये युरो चषकात दुसर्‍या आणि 2013 च्या कॉन्फेडरेशन चषकात तिसर्‍या स्थानावर राहिला होता. यातून 2010 च्या विश्वचषकातील पराभवातून संघ पूर्णपणे सावरल्याचे इटलीच्या खेळाडूंनी सिद्ध केले.

मिडफील्डवर मदार
सेंट्रल मिडफील्डवरचे तीन दिग्गज खेळाडू हीच टीमची मजबूत बाजू आहे. आंद्रे पिरलो हा डावपेच आणि पासिंग करण्यात माहीर आहे. त्याच्या या शैलीला मार्सिसियो आणि डॅनियल डी रोसी अधिकच खतरनाक स्वरूप मिळवून देतात.

डिफेन्स दुबळी बाजू
डावपेचात तरबेज असलेल्या इटलीचा डिफेन्स हा दुबळा आहे. संघाकडे जॉजियो चिलेनीसारखा जगातील सर्वोत्कृष्ट सेंट्रल डिफेंडर आहे. मात्र, इतर डिफेंडरकडे आंतरराष्ट्रीय सामन्यातील फारसा अनुभव नाही.

पिरलो असणार डावपेचांचे केंद्र
आंद्रे पिरलोने वयाची 35 वर्षे गाठली आहेत. मात्र, तरीही टीमसाठी डावपेच आखणे हे त्याच्यासाठी अधिकच सोपे काम आहे. त्यामुळे इटली टीमची सर्वात मजबूत बाजू म्हणूनही पिरलोला मानले जाते. क्वालिफाइंगच्या नऊ सामन्यांत त्याने इटलीचे प्रतिनिधित्व केले होते. यावरूनच टीममधील पिरलोचे महत्त्व स्पष्ट होते.