आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA World Cup News In Marath, Portugal Vs America, Divy Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA Cup: पोर्तुगाल-अमेरिका यांच्यात आज लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनौस - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ग्रुप ‘जी’ मध्ये रविवारी पोर्तुगाल आणि अमेरिका यांच्यादरम्यान लढत होईल. क्रिस्टियानो रोनाल्डची दुखापत आणि पेपेला मिळालेल्या रेड कार्डमुळै पोर्तुगालची चिंता वाढली आहे. त्यांना अमेरिकेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागले. त्यांच्यासमोर मागच्या सामन्यात घानाला 2-1 ने पराभूत करणा-या अमेरिकेचे आव्हान असणार आहे. अमेरिकेच्या संघाने 2002 विश्वचषकात पोर्तुगालचा 3-2 ने पराभव करून अंतिम-16 मध्ये स्थान मिळवले होते. या वेळीसुद्धा या संघाकडून हीच अपेक्षा असणार आहे.

नशीब आजमावण्यासाठी उतरणार अल्जेरिया
बेल्जियमविरुद्धच्या लढतीत विश्वचषकाच्या 28 वर्षांतील गोलचा दुष्काळ संपवणारा अल्जेरियाचा संघ रविवारी द. कोरियाविरुद्ध नशीब आजमवण्याच्या उद्देशाने खेळणार आहे. ग्रुप ‘एच’च्या क्रमवारीत बेल्जियमचा संघ अव्वल, तर कोरिया आणि रशिया संयुक्तरीत्या दुस-या स्थानावर विराजमान आहेत. अल्जेरियाचा मागच्या सामन्यात बेल्जियमकडून 2-1 ने पराभव झाला होता. मात्र, त्याला अजूनही अंतिम 16 मध्ये स्थान बनवण्याची आशा आहे.