आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA World Cup News In Marathi, France Vs Switzerland, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA Cup: स्वित्झर्लंडविरुद्ध फ्रान्सचा 5-2 ने विजय, अव्वल स्थान झाले अधिक मजबूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साल्वाडोर - जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सने फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. या टीमने शुक्रवारी मध्यरात्री जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या स्वित्झर्लंडचा 5-2 अशा फरकाने पराभव केला. यासह फ्रान्स संघाने इ ग्रुपमध्ये सहा गुणांच्या बळावर अव्वल स्थान अधिक मजबुत केले. आता फ्रान्स संघाचा सामना 25 जुन रोजी इक्वाडोरशी होईल.

गिराऊड (17मि.), माटुडी (18मि.), वाल्बुना (40मि.), करिम बेन्झेमा (67मि.) आणि सिस्सोका (73मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर फ्रान्सने सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला. स्वित्झर्लंडसाठी डेन्झेमाल्ली (81मि.) आणि झाका (87मि.) यांनी केलेली खेळी व्यर्थ ठरली. आता स्वित्झर्लंडचा स्पर्धेतील तिसरा सामना 25 जुन रोजी होंडूरसशी होईल.

धडाकेबाज विजयी सलामीने आत्मविश्वास दुणावलेल्या फ्रान्स संघाने सामन्यात दमदार सुरुवात केली. गिराऊडने प्रतिस्पर्धी टीमच्या गोलरक्षकाला हुलकावणी देऊन गोल करण्यात यश मिळवले. त्याने 17 व्या मिनिटाला फ्रान्सकडून गोलचे खाते उघडले. यासह फ्रान्सने लढतीत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यापाठोपाठ अवघ्या एका मिनिटांत माटुडीने फ्रान्सच्या आघाडीला 2-0 ने मजबुत केले. त्याने 18 व्या मिनिटाला वैयक्कि पहिला आणि संघाकडून दुसरा गोल केला.
त्यानंतर 40 व्या मिनिटाला वाल्बुनाने फ्रान्सकडून तिसरा गोल केला. याशिवाय फ्रान्सने मध्यतरांपूर्वी 3-0 ने मोठी आघाडी मिळवली. दरम्यान, स्वित्झर्लंडने गोलचे खाते उघडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, या संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

दुस-या हाफमध्येही दबदबा
फ्रान्सच्या खेळाडूने दुस-या हाफमध्येही करिम बेन्झेमा आणि सिस्सोकाने स्वीस संघाला धक्का दिला. या दोघांनीही प्रत्येकी एक गोल करून फ्रान्सचा 5-0 ने विजय निश्चित केला. दरम्यान, 81 व्या मिनिटाला स्वीसने सामन्यात पहिला गोल केला. डेन्झेमाल्लीने ही कामगिरी केली.
फ्रान्स संघाच्या खेळाडूंनी गोलचा उडवला धमाका
फ्रान्स संघाच्या खेळाडूने दमदार सुरुवात करताना अवघ्या 17 व्या मिनिटांपासून गोलचा धमाका उडवण्यास सुरुवात केली.

17 वा मिनिट, पहिला गोल (गिराऊड)
18 वा मिनिट, दुसरा गोल (माटूडी)
40 वा मिनिट, तिसरा गोल (वाल्बुना)
67 वा मिनिट, चौथा गोल (बेन्झेमा)
73 वा मिनिट, पाचवा गोल (सिस्सोका)
81 वा मिनिट, सहावा गोल (डेन्झेमाल्ली, स्वीस)
87 वा मिनिट, सातवा गोल (झाका, स्वीस)
02 विजय फ्रान्स संघाने इ गु्रपमध्ये मिळवले आहेत
06 गुणांसह फ्रान्स संघ अव्वल स्थानावर कायम आह
पुढे पाहा फ्रान्स संघाच्या खेळाडूंनी गोलचा उडवला धमाका....