आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA World Cup News In Marathi, Germany Verses Ghana, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्मनीचे लक्ष्य आता ‘नॉकआऊट’ फेरीत स्थान मिळण्‍याचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्टालेजा - शनिवारच्या लढतीत घानाला हरवून नॉकआऊट फेरीत स्थान मिळवण्याचा जर्मनीचा प्रयत्न असेल. पहिल्या सामन्यातील जर्मनीच्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. जर्मनीचा संघ मागच्या विश्वचषकात सेमिफायनल, तर 2002 मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र, 1990 पासून आतापर्यंत त्यांना एकदाही विजेतेपद पटकावता आले नाही. पोर्तुगालला 4-0 ने हरवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारी स्टार्टिंग लाइनअपच याही सामन्यात कायम ठेवण्याचा जर्मनीचे प्रशिक्षक जोआकिम लोव्ह यांचा निर्धार असेल. या दोन्ही संघांत आतापर्यंत दोन लढती झाल्या असून दोन्हीही जर्मनीनेच जिंकल्या आहेत.

इराण-अर्जेंटिना आमने-सामने
किताबाचा प्रबळ दावेदार समजला जाणारा अर्जेंटिनाचा संघ शनिवारी ग्रुप ‘एफ’मध्ये इराणला आव्हान देण्यास उतरणार आहे. अर्जेंटिनाने हा सामना जिंकल्यास त्यांचे 6 गुण होतील आणि त्यांना नॉकआऊट फेरीत प्रवेश मिळेल. फॉरवर्ड लाइनमध्ये खेळाडूंचा चांगला ताळमेळ असल्याने बोस्नियाविरुद्ध दुस-या हाफमध्ये केलेला खेळच आम्ही याही सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे मत अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेसीने व्यक्त केले आहे. दुसरीकडे इराणचा विंगर अश्कान देजागाह आणि स्ट्रायकर रेजा गुचानेजाद यांना आधीच्या लढतीत कमी संधी मिळाल्या आहेत, तरीसुद्धा अर्जेंटिनाची बचाव फळी भेदण्याची त्यांच्यात क्षमता आहे. अर्जेंटिनाचा पराभव करण्यासाठी आम्हाला चमत्काराची गरज पडेल, असे मत इराणचे प्रशिक्षक कार्लोस क्विरोज यांनी व्यक्त केले आहे.

नायजेरिया-बोस्निया प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळणार
ग्रुप ‘एफ’च्या अन्य एका लढतीत नायजेरिया आणि बोस्निया हर्जेगोव्हिनाचा संघ आमनेसामने असतील. दोन्हीही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. फिफा क्रमवारीत नायजेरिया 44 व्या, तर बोस्निया 21 व्या स्थानावर आहे. मात्र, नायजेरियाला विश्वचषक स्पर्धेचा अधिक अनुभव आहे. नायजेरियाची ही पाचवी विश्वचषक स्पर्धा आहे, तर बोस्नियाचा संघ पहिल्यांदाच खेळतोय. नायजेरियाची इराणविरुद्धची सलामीची लढत 0-0 ने अनिर्णित ठरली होती, तर बोस्नियाला अर्जेंटिनाविरुद्ध 1-2 ने पराभव पत्करावा लागला होता. दोन्ही संघ सध्या आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे.