साओ पावलो - जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या उरुवेने फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पहिल्या धक्कादायक विजयाची नोंद केली. या टीमने गुरुवारी मध्यरात्री माजी चॅम्पियन इंग्लंडचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. सलग दुस-या पराभवामुळे इंग्लंडचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. हा सामना शेवटच्या मिनिटांपर्यंत रोमांचकपणे खेळवल्या गेला.
वेगवान फॉरवर्ड लुईस सुआरेझने (39, 85मि.) शानदार दोन गोल करून उरुग्वेला धडाकेबाज विजय मिळवून दिला. या सह उरुग्वे संघ वर्ल्डकपमध्ये विजयी ट्रॅकवर परतला आहे. माजी चॅम्पियन इंग्लंडसाठी वायने रुनीने (75मि.) केलेला एकमेव गोल व्यर्थ ठरला. या सामन्यात वायने रुनी सपशेल अपयशी ठरला.
माजी विजेत्या उरुग्वेने वर्ल्डकपमध्ये विजयाचे खाते उघडून दमदार पुनरागमन केले. दुसरीकडे पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या इंग्लंडवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे. या पराभवासह इंग्लंडचे साम्राज खालसा झाले. त्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये मातम निर्माण झाला आहे.सुआरेझपाठोपाठ कवानी आणि रॉड्रिग्ज यांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे उरुग्वेला विजयी ट्रॅकवर परतता आले. या वेळी इंग्लंडचे आघाडीचे खेळाडू मात्र, सपशेल अपयशी ठरले.
जपान-ग्रीस लढत बरोबरीत
वर्ल्डकपच्या सी ग्रुपमध्ये जपान आणि ग्रीस यांच्यातील रोमांचक सामना शुन्य गोलने बरोबरीत राहीला. शेवटच्या मिनिटांपर्यंत दोन्ही संघांनी गोलचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, या टीमला अपेक्षित यश संपादन करता आले नाही. परिणामी लढत बरोबरीत राहीली. या वेळी दोन्ही संघांना सामन्यात प्रत्येकी एक गुणावर समाधान मानावे लागले.
उरुग्वेचा डबल धमाका
प्रभावी डावपेच
माजी चॅम्पियन उरुग्वेने पहिल्या विजयासाठी मैदानावर उल्लेखनिय कामगिरीचे प्रदर्शन केले. टीमने 4-4-2 या प्रभावी डावपेचाच्या बळावर सामन्यात सुरेख कामगिरी केली. यासह उरुग्वेने इंग्लंडला पराभवाची धुळ चारली. दुसरीकडे इंग्लंडचे 4-2-3-1 चे डावपेच अपयशी ठरले.
दमदार सुरुवात
उरुग्वेच्या सुआरेझने सामन्यात गोलचे खाते उघडले. त्याने सामन्याच्या 39 व्या मिनिटाला पहिला गोल केला. या गोलच्या बळवर उरुग्वेने लढतीत 1-0 ने आघाडी मिळवली. यामुळे या संघाला मध्यतरांपूर्वीच लढतीत आपला दबदबा निर्माण करत आला. इंग्लंडचा बरोबरी मिळवण्याचा प्रयत्न फोल ठरला.
सुआरेझचा विजयी गोल
उरुग्वेच्या वेगवान फॉरवर्ड लुईस सुआरेझने विजयी गोल केला. त्याने 85 व्या मिनिटाला इंग्लंडच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत हे महत्त्वपूर्ण यश संपादन केले. याशिवाय त्याने वैयक्तिक आणि टीमकडून केलेल्या दुस-या गोलच्या बळावर उरुग्वेचा विजय निश्चित केला.
वायने रुनीने साधली बरोबरी
इंग्लंडचा आघाडीचा हुकमी एक्का वायने रुनीने लढतीत दुस-या हाफमध्ये शानदार गोल केला. त्याने 75 व्या मिनिटाला हे यश संपादन केले. यासह त्याने इंग्लंडला 1-1 ने सामन्यात बरोबरी मिळवून दिली. इंग्लंडचा सामन्यातील हा एकमेव गोल ठरला. मात्र, यामुळे इंग्लंडला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
2-1 ने उरुग्वेने जिंकला सामना
02 गोल लुईस सुआरेझने केले
75 व्या मिनिटाला वायने रुनीचा गोल
85 व्या मिनिटाला सुआरेझने केला विजयी गोल