इटलीचा स्टार फुटबॉलपटू स्ट्रायकर मारियो बालोटेली गर्लफ्रेंड फॅनी नगुएशा सोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. अशी माहिती त्याने आपल्या
ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करुन सांगितले. लग्नाच्या तारखेविषयी अजून तरी त्याने काही स्पष्ट केले नाही.
बालोटेली सध्या ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये व्यस्त असतानाही त्याने साखरपूड्याचे काही फोटो सोशलसाइट्वर पोस्ट केली आहेत. फॅनीचे वडील ब्राझीलचे असून आई इजिप्तची आहे. त्यांनीही काही फोटो पोस्ट केली आहेत. त्यामध्ये बालोटेली फॅनीच्या बोटामध्ये अंगठी घालत आहे.
युरो चषकामध्ये दाखविली होती झलक
बालोटेलीने यूरो चषकामध्ये धमाकेदार प्रदर्शन करत 2012 मध्ये इटलीला अंतीम सामन्यात स्थान मिळवून दिले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि पाहा, बालोटेली आणि फॅनीचे छायाचित्रे...