आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA WC : जर्मनी सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ - माजी विश्वविजेत्या फ्रान्सला 1-0 ने पराभूत करून जर्मनीने विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. हमेल्सने सामन्याच्या तेराव्या मिनिटाला केलेल्या गोलच्या भरवशावर जर्मनीने हा विजय मिळवला. त्यांचा सामना ब्राझील व कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल.

तीन वेळचा विश्वविजेता ठरलेल्या जर्मनीने सलग चौथ्यांदा आणि एकूण 13 वेळा (1934, 54, 58, 66, 70, 74, 82, 86, 90, 2002, 06, 10) विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत प्रवेश केला आहे. दोन्ही दिग्गज संघात शुक्रवारी अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. फ्रान्सचा स्ट्रायकर बेंजेमाने सामन्याच्या सातव्या मिनिटाला जर्मनीच्या गोलपोस्टवर हल्ला केला. मात्र, त्यात तो अपयशी ठरला. सामन्याच्या तेराव्या मिनिटाला जर्मनीला डाव्या बाजूने गोलपोस्टपासून सुमारे 30 फूट दूर अंतरावरून एक फ्री किक मिळाली. टोनी क्रुजने ही किक गोलपोस्टकडे हवेतूनच मारली. गोलपोस्टजवळ उभा असलेल्या मॅट्स हमेल्सने ही किक हेडरवर घेत चेंडूला थेट गोलपोस्टचा रस्ता दाखवला. दरम्यान, तो चेंडू गोलपोस्टच्या पाइपला जाऊन लागला होता. मात्र, नंतर तो गोलपोस्टमध्ये जाऊन पडला.

दरम्यान, जर्मनीचा गोलकीपर नेऊरने शुक्रवारी दमदार कामगिरी केली. 42 व्या मिनिटाला पॅट्रिक एव्हराबेंजेमा व 44 व्या मिनिटाला बेंजेमा पोग्बा यांनी केलेला हल्ला त्याने सर्मथपणे पेलला. नेऊरसोबतच लॉम व हमेल्स यांनी जर्मनीसाठी शानदार बचावात्मक खेळाचे प्रदर्शन केले. 88 व्या मिनिटाला थॉमस मुलर व इंज्युरी टाइमच्या शेवटी बेंजेमाच्या एका आक्रमक शॉटला जर्मनीच्या गोलकीपरने अडवले.
(फोटो - सामन्याच्या तेराव्या मिनिटाला मॅट्स हमेल्सने टोनी क्रुजच्या किकवर शानदार हेडर केला तो क्षण)