रियो डी जिनेरिया - फीफा विश्व चषकाचा ज्वर उत्तरोत्तर वाढत जात आहे. चाहते अगदी बेभान झाले आहेत. चाहते लियोनेल मेसीच हुबेहुब नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहे. कुणी बॉडी पेंटिंग तर कुणी आकर्षक हेअर स्टाइल करत आहेत. आपल्याला आश्यर्च वाटेल, ब्राझीलचा रॉब फेरेल कोणत्याही स्टार फुटबॉलपटूचा फोटो पाहून डोक्यावर त्याचे स्केच तयार करून देतो.
चाहत्यांच्या लागल्या रांगा
टाइम डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हापासून रॉबची कलाकारी लोकांनी पाहिली तेव्हापासून त्याच्याकडे चाहत्यांच्या चक्क रांगा लागल्या आहेत. रॉब फेरेल म्हटला, 'मी सर्वप्रथम रंगीत पेन्सिलने डोक्यावर चित्र रेखाटतो नंतर वस्त-याच्या सहाय्याने त्याला आकारास आणतो. आतापर्यंत मी अनेक स्टार खेळाडू तसेच नेत्यांचे स्केच तयार केले आहे.'
मेसीला मागणी
रॉबने सांगितले की, चाहत्यांमध्ये मेसीची क्रेझ असून सर्वांत जास्त मेसीच्या स्केचचीच मागणी जास्त आहे.
रोनाल्डो पडला मागे
फीफा विश्व चषक सुरु होण्यापूर्वी रोनाल्डोच्या स्केचची मागणी जास्त होती. परंतु रोनाल्डोचा संघ बाहेर पडल्यानंतर मेसीच्या स्केचची मागणी वाढत आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, रॉबच्या कलाकारीचे छायाचित्रे...