आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Huntelaar Puts Netherlands Into Last Eight After

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : मेक्सिकोला हरवून हॉलंड प्री-क्वार्टरमध्ये दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्टलिजा - रोमहर्षक ठरलेल्या नॉकआऊटच्या लढतीत 87 व्या मिनिटांपर्यंत आघाडीवर असलेल्या मेक्सिकोला हॉलंडने हरवून सनसनाटी विजयाची नोंद करत प्री-क्वार्टरमध्ये स्थान मिळवले.

87 व्या मिनिटापर्यंत 1-0 ने आघाडीवर असलेल्या मेक्सिकोचा संघ विजयाच्या अगदी समीप होता आणि त्यांचे सर्मथक मैदानात जल्लोष करत होते. मात्र, 88 व्या मिनिटाला हॉलंडचा स्ट्रायकर स्नायडरने शानदार गोल करत सामना बरोबरीत आणून सोडला. याच्या चार मिनिटांनंतर माक्र्विजच्या फाऊलवर हॉलंडला पेनल्टी मिळाली आणि हीच पेनल्टी निर्णायक ठरली. हॉलंडचा बदली खेळाडू हंटेलारने इंज्युरी टाइममध्ये मिळालेली ही पेनल्टी गोलमध्ये परावर्तित करण्यात कोणतीच चूक केली नाही. या गोलमुळे हॉलंडने 2-1 अशा फरकाने विजय नोंदवत क्वार्टर फायनलची जागा निश्चित केली.

या सामन्यात मेक्सिकोने हॉलंडला तगडी टक्कर दिली. एकवेळ त्यांचा विजय दृष्टिपथातही होता. मात्र, हंटेलारने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. दोन्ही संघांतील आक्रमक संघर्षानंतरही पहिल्या हाफमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. दुसर्‍या हाफचा खेळ सुरू होताच सांतोसने 48 व्या मिनिटाला शानदार गोल करत मेक्सिकोला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी भरून काढण्यासाठी हॉलंडने अनेक प्रयत्न केले. मात्र, मेक्सिकोचा गोलकीपर ओचाओने त्यांना यश मिळू दिले नाही. सामन्याच्या 88 व्या मिनिटाला स्नायडरने ओचाओला चकमा देत गोलपोस्टचा वेध घेतला आणि आघाडी 1-1 ने बरोबरीत आणून पोहोचवली. त्यामुळे मेक्सिकोच्या विजयाची तयारी करत असलेल्या प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पडले आणि हॉलंडच्या प्रेक्षकांनी जल्लोष करायला सुरुवात केली.
(फोटो - निर्णायक गोल केल्यानंतर आनंद साजरा करताना हॉलंडचा खेळाडू हंटेलार)