आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IFA WC 2014 : Costa Rica Win In Penalty Shootout Against Greece, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC: पेनल्‍टी शुटआउटमध्‍ये ग्रीसला पराभूत करुन कोस्‍टारिकाचा उपांत्‍यपूर्व फेरीत प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेसिफ - अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या लढतीत कोस्टारिकाच्या संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रीसचा 5-3 ने पराभव करत पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. त्‍यांचा पुढील सामना नेदरलँडशी होणार आहे.
शूटआऊटचा रोमांच
तत्त्पुर्वी, निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी सामना 1-1 ने बरोबरीत सोडला होता. त्यानंतर देण्यात आलेल्या इंज्युरी टाइममध्येसुद्धा दोन्हीकडून समान बचाव आणि आक्रमण झाल्यामुळे सामना थेट पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला आणि कोस्टारिकाने यात बाजी मारली.
सुरूवातीपासूनच दोन्ही संघ आक्रमक शैलीने खेळत होते. मात्र, पहिल्या हाफमध्ये ते गोल करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर दुसर्‍या हाफच्या सुरुवातीलाच 52 व्या मिनिटाला ब्रायन रुईजने अप्रतिम गोल करत कोस्टारिकाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
निर्धारित वेळेपर्यंत स्‍कोर 1-1 वरच
निर्धारित वेळेच्या शेवटपर्यंत ही आघाडी कायम होती. मात्र, सॉकट्रिसने 90 व्या मिनिटाला गोल करत ग्रीसला सामन्यात 1-1 ची बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळ संपल्यामुळे सामना इंज्युरी टाइममध्ये खेळवण्यात आला. इंज्युरी टाइममध्येही दोन्ही संघांनी जोरदार आक्रमणे केली. मात्र, दोन्हीकडील एकही खेळाडू गोल करण्यात यशस्वी न ठरल्याने हा सामना अखेर पेनल्टी शूटआऊटपर्यंत जाऊन पोहोचला.

गोलकिपरला मॅन ऑफ द मॅच
कोस्टारिकाचा गोलकिपर नवासने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावत ग्रीसला निष्प्रभ ठरवून टाकले. यात कोस्टारिकाच्या खेळाडूंनी 4 तर ग्रीसकडून 2 पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये होऊ शकले. या बळावरच कोस्टारिकाने त्यांच्या इतिहासात प्रथमच फिफा विश्वचषक स्‍पर्धेच्या क्वार्टर फायनलपर्यंत धडक दिली. महत्‍वपूर्ण कामगिरी करणा-या कोस्टारिकाच्या गोलकिपरला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
ग्रीसचा आतापर्यंतचा प्रवास
ग्रीसने पहिल्‍याच सामन्‍यामध्‍ये कोलंबिया विरुध्‍द 0-3 ने पराभव पत्‍करला होता. दुस-या सामन्‍यामध्‍ये त्‍यांनी जपानसोबत ड्रॉ साधला होता. तर अंतीम सामन्‍यामध्‍ये आयव्‍ही कोस्‍टला 2-1 ने पराभूत करुन बादफेरीत प्रवेश मिळविला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यानची निवडक छायाचित्रे..