येत्या 12 जून पासून ब्राझीलमध्ये फुटबॉलचा महासंगर सुरु होत आहे. संपुर्ण वातावरण फुटबॉलमय झाले आहे. फुटबॉललाच धर्म मानणा-या दिग्गज फुटबॉलपटू पेलेच्या देशातील वातावरण फुटबॉलने भारुन निघाले आहे. अशात फुटबॉलचा चाहता भारतीय क्रिकेटचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मेस्सीला पाठिंबा दर्शविला आहे. त्याने अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीची स्वाक्षरीचा टी-शर्टचा फोटो सोशल साईट्सवर पोस्ट केला आहे.
महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपटू असून त्याचे लाखों चाहते आहेत. धोनीने युनिसेफचे लियोनेल मेस्सीचा सही असलेला टी शर्ट पोस्ट करुन सर्व चाहत्यांना विचार करायला भाग पाडले आहे. धोनीने शेअर केलेला हा फोटो मोठ्या प्रमाणावर त्याचे फॉलोअर्स शेअर कतर असून त्यावर कमेंट्स करत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा धोनीचे फुटबॉलप्रेम...