आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Shooter Jitu Became The World's Number One

भारताचा जीतू राय बनला जगातील 'नंबर वन' नेमबाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगढ - भारताचा नेमबाज जीतू राय एअर पिस्‍टर या नेमबाजीच्‍या प्रकारात जागतिक नामांकनामध्‍ये प्रथम स्‍थानी पोहोचला असल्‍याचे भारतीय राष्ट्रीय राइफल संघ (एनआरएआय) ने सांगितले.
महुमध्‍ये करतो सराव
जीतू मुळ लखनौचा असून सध्‍या महू (मध्‍यप्रदेश) मध्‍ये तो सराव करत आहे. भारतीय लष्‍करातील तो नेमबाज आहे. यापूर्वी अंजलि भागवत, राज्यवर्धन सिंह राठौड़, गगन नारंग, मानवजीत सिंह संधू, रोंजन सोढ़ी आणि हीना सिद्धू यांनी आपापल्‍या नेमबाजी प्रकारात अव्‍वल स्‍थान मिळवले होते.
रणइंदर सिंहच्‍या शुभेच्‍छा
एनआरएआयचे अध्‍यक्ष रणइंदर सिंहने आपल्‍या शुभेच्‍छापर संदेशामध्‍ये म्‍हटले की, जीतूने देशाच्‍या गौरवासाठी त्‍याने उत्‍तरोत्‍तच चांगली कामगिरी करावी.
विश्‍व चषकात दोन पदकांची कमाई
जीतू रायने आंतरराष्‍ट्रीय नेमबाजीमध्‍ये उत्‍कृष्‍ठ प्रदर्शन करत एअर पिस्‍तुल प्रकारात सुवर्ण पदकाची कामगिरी केली होती. तर फ्री स्‍टाइल प्रकारात 0.1 पॉईंटने त्‍याला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. विश्‍वचषकात दोन पदकं मिळविणार तो एकमेव भारतीय ठरला आहे.