आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘..तरच फुटबॉलच्या विश्वात भारतीय संघाची हवा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अत्याधुनिक तंत्रज्ञान व सेवा सुविधांसह मैदानाची निर्मिती, गुणवत्ताधारक प्रशिक्षक आणि प्रतिभावंत युवा खेळाडू घडवण्याची इच्छा निर्माण झाल्यास फुटबॉलच्या विश्वात भारत आपली वेगळी ओळख निर्माण करेल. तसेच या विश्वात निश्चितपणे भारताची हवा निर्माण होईल, असा विश्वास भारतीय फुटबॉल संघाचे माजी व्यवस्थापक मंदार ताम्हाणे यांनी दैनिक ‘दिव्य मराठी’शी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केला. विदेशी कोच विम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाच्या कामगिरीचा दर्जा उंचावत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. फिफाच्या क्रमवारीत भारतीय संघ 144 गुणांसह 154 व्या स्थानावर आहे.

महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक
सध्या महाराष्ट्रात फुटबॉल क्लबची झपाट्याने संख्या वाढत आहे. त्याचा फायदा मोठय़ा प्रमाणात युवा खेळाडूंना मिळत आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची आय लीग, संतोष ट्रॉफीसारख्या फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी समाधानकारक आहे. मात्र, हा दर्जा उंचावण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रातील बोटावर मोजण्याइतकेच खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. मात्र, काही दिवसांत ही स्थिती बदलण्याचे चित्र निर्माण झाले आहे, असेही ताम्हाणे म्हणाले.

ब्राझील, र्जमनीला कौल
सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या किताबाचे अनेक दावेदार आहेत. मात्र, यंदाच्या स्पर्धेत ब्राझील आणि र्जमनीपाठोपाठ अर्जेंटिना संघ बाजी मारू शकतो. तसेच कोलंबिया, हॉलंडमध्येही चत्मकार घडवण्याची क्षमता आहे. त्यामुळे या टीमलाही कमी लेखून चालणार नाही, असाही अंदाज ताम्हाणे यांनी वर्तवला.

भारतीय संघाची कामगिरी दर्जेदार
फिफाच्या क्रमवारीत भारतीय संघ 154 व्या स्थानावर आहे. गत पाच वर्षांपासून भारतीय संघाच्या कामगिरीत वेगाने प्रगती साधली जात आहे. भारताची कामगिरी टॉप-150 च्या आतील संघाच्या तुलनेत दर्जेदार आहे. भारत टॉप-100 मध्ये धडक मारेल, असा विश्वास ताम्हाणे यांना आहे.

मेसी, रोनाल्डोमुळे फायदा
लवकरच फुटबॉलमध्ये इंडियन सुपर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, या लीगचा भारतातील युवा खेळाडूंना कोणताही फायदा होणार नाही. यात मानधनाच्या मोहात पडलेले विदेशातील वयस्कर खेळाडू सहभाग घेत आहेत. त्यापेक्षा मेसी, रोनाल्डोसारख्या स्टार खेळाडूंमुळे आयएसएलचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.