मॅक्सिको सिटी - ब्राझीलला घरच्या मैदानावर रोखण्यात महत्वाची भूमिका पार पाडणार मॅक्सिकोचा गोलकीपर ओचोआवर मॅक्सिकोची लोकप्रिय गायिका थालिया आकर्षित झाली आहे. थालियाने आपल्या
ट्विटर अकाउंटवर ओचोआला लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे.
थालियाने आपल्या ट्वीट मध्ये लिहिले आहे, की ‘ओचोआ, मॅरी मी!’ सोबतच ओचोआचा एक फोटोसुध्दा पोस्ट केला आहे. ओचोओच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मेक्सिको विरुध्द ब्राझील हा अत्ंयत चुरसीचा सामना अनिर्णित राहिला होता.
अभिनेता गेल गार्सियाने दिल्या शुभेच्छा
मॅक्सिकाचा ख्यातनाम अभिनेता गेल गार्सिया बेरनालने ट्वीटमध्ये मॅक्सिकोच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. त्याने ‘मेमो, वी लव यू’असे ट्वीट केले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, थालियाची निवडक छायाचित्रे...