आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : हॉलंड-मेक्सिको दरम्यान आज काट्याची लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्टालेझा - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी गत उपविजेता हॉलंड आणि मेक्सिको यांच्यात काट्याची लढत रंगणार आहे. या प्री-क्वार्टर सामन्यात हॉलंडच्या पर्सी व रॉबिनवर सर्वांची नजर असेल.

ग्रुप बीमध्ये सलग विजयाची नोंद करत हॉलंड गुणतालिकेत 9 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. तर, ए ग्रुपमध्ये मेक्सिको सात गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. गैरवर्तनामुळे रॉबिन वान पर्सीला चिलीविरुद्ध सामन्यात बाहेर बसवण्यात आले होते. मात्र, आता मेक्सिकोविरुद्ध सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करण्यावर त्याचा अधिक भर असेल. यात त्याला रॉबिनची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. या जोडीने स्पर्धेच्या गटातील सामन्यात प्रत्येकी तीन गोल करून शानदार खेळीचे प्रदर्शन केले. दुसरीकडे मेक्सिकोच्या संघाने दोन विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. सलामीच्या लढतीत कॅमरूनवर 1-0 ने मात करून मेक्सिकोने वर्ल्डकपमधील आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली होती.

सर्वाधिक गोल हॉलंडच्या नावे
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये हॉलंड संघाच्या खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. या संघातील खेळाडूंनी आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक 10 गोल केले आहेत. सर्वाधिक गोलमध्ये हॉलंड टीम आघाडीवर आहे. यात भर घालण्याचा हॉलंडचा आज प्रयत्न असेल.

हॉलंडचा दबदबा
आतापर्यंत मेक्सिको आणि हॉलंड हे संघ सहा सामन्यात समोरासमोर आले आहेत. त्यापैकी तीन सामन्यांत हॉलंडने विजयश्री मिळवली आहे. यासह हॉलंडने मेक्सिकोविरुद्ध आपला दबदबा निर्माण केला आहे. तसेच मेक्सिकोला केवळ दोनच सामने जिंकता आले. एक लढत बरोबरीत राहिली.

कोस्टारिकासमोर ग्रीसचे आव्हान
तब्बल 24 वर्षांनंतर कोस्टारिकाने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम 16 मध्ये धडक मारली. आता स्पर्धेची पुढची फेरी गाठण्याचा कोस्टारिकाचा प्रयत्न असेल. मात्र, या टीमसमोर रविवारी ग्रीसचे तगडे आव्हान आहे. ग्रुप डीमध्ये उरुग्वेला पिछाडीवर टाकून सात गुणांसह कोस्टारिकाने अव्वल स्थान गाठून सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला. वेगवान खेळीच्या बळावर कोस्टारिकोने दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे ग्रीसविरुद्ध विजयाचा कोस्टारिकाचा दावा अधिक प्रबळ मानला जात आहे.