आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Netherlands Win 2 1 Against Mexico, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC: रोमांचक लढतीमध्‍ये नेदरलँडचा मॅक्सिकोवर विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्टलिजा - 20 व्‍या फीफा विश्वचषकातील बादफेरीच्या लढतीत मेक्सिकोला इंज्युरी टाइममध्ये हरवून नेदरलँडने सनसनाटी विजयाची नोंद करत प्री -क्वार्टरमध्ये स्थान मिळवले. 88 व्‍या मिनिटापर्यंत पिछाडीवर असलेल्‍या नेदरलँडने अंतीम सहा मिनिटामध्‍ये दोन गोल केले. नेदलँडचा पुढील सामना कोस्‍टामध्‍ये होणार आहे.

इतिहास घडवू शकला नाही मॅक्सिको
मॅक्सिकोने 1986 नंतर पहिल्‍यांदाज विश्‍वचषकामध्‍ये अंतीम आठ जणांमध्‍ये जागा निश्चित करेल असे वाटले होते.

87 व्या मिनिटापर्यंत 1-0 ने आघाडीवर असलेल्या मेक्सिकोचा संघ विजयाच्या अगदी समीप होता. मात्र, 88 व्या मिनिटाला नेदरलँडचा स्ट्रायकर स्नायडरने शानदार गोल करत सामना बरोबरीत आणून सोडला.

88 मिनिटांपर्यंत मॅक्सिको आघाडीवर
अत्‍यंत चुरशीच्‍या चालेलेया लढतीमध्‍ये 88 व्या मिनिटापर्यंत मॅक्सिको 1-0 ने आघाडीवर होता. किंबहूना विजयाच्या अगदी समीप होता.

ओचोआचे समाधानकारक प्रदर्शन
मॅक्सिकोचा स्‍टार ओचोआने उत्‍तम का‍मगिरी केली. त्‍याने अप्रतिम शॉट्स अडवले. परंतु त्‍याला स्‍नायडर आणि हुंटलारचे गोल रोखण्‍यात अपयश आले.

हुंटेलार ठरला विजयाच हिरो
चार मिनिटांनंतर माक्र्विजच्या फाऊलवर नेदरलँडला पेनल्टी मिळाली. नेदरलँडचा बदली खेळाडू हुंटेलारने इंज्युरी टाइममध्ये मिळालेली ही पेनल्टी गोलमध्ये परावर्तित करण्यात कोणतीच चूक केली नाही. या गोलमुळे नेदरलँडने 2-1 अशा फरकाने विजय नोंदवत क्वार्टर फायनलची जागा निश्चित केली. या सामन्यात मेक्सिकोने नेदरलँडला तगडी टक्कर दिली. एकवेळ त्यांचा विजय दृष्टिपथातही होता. मात्र, हंटेलारने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्यानची निवडक छायाचित्रे