आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Netherlands Win Against Costa Rica, Qualify For Semifinal, Divya Marathi

FIFA WC: 24 वर्षांनंतर सेमीफायनलमध्‍ये पोहोचले अर्जेंटिना, नेदरलॅडने कोस्‍टारिकाचा केला पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साल्‍वोडोर - गत उपविजेते आणि यावर्षीच्‍या विश्‍वचषकाचा प्रबळ दावेदार समजल्‍या जाणारा नेदरलँड संघांने क्‍वार्टर फायनल पर्यंत मजल मारली होती. पेनल्‍टी शुटआऊटमध्‍ये त्‍यांनी कोस्‍टारिकाचा 4-3 ने पराभव केला. या विजयामुळेच त्‍यानी सेमीफायनलमध्‍ये स्‍थान मिळविले आहे. अन्‍य मुकाबल्‍यात अर्जेंटीनाने बेल्जियमला 1-0 ने पराभूत करुन सेमीफायनलमध्‍ये जागा मिळविली आहे. तब्‍बल 24 वर्षांनी अर्जेंटिना सेमीफायनलपर्यंत पोहोचले आहे. 9 जुलै रोजी सेमीफायनलमध्‍ये अर्जेंटिना आणि नेदरलँड आमने-सामणे येणार आहेत.
शुटआउटचा रोमहर्षक क्षण
निर्धारित वेळपर्यंत 0-0 अशा बरोबरीत राहिलेल्‍या या सामन्‍या एक्‍ट्रा टाईमध्‍येही गोल लागू शकला नाही. त्‍यानंतर शुटआऊटमध्‍ये नेदरलँडने 4-3 ने कोस्‍टारिकाचा पराभव केला. नेदरलँडच्‍या वान पर्सी, अर्जेन रॉबेन, वेन स्नाइडर, डिर्क क्यूट यांनी गोल केले. तर कोस्‍टारिकाच्‍या बोर्गेस, गेन कार्लो गोजालेज, क्रिस्टेन बोलानोस ने गोल केले. परंतु कर्णधार ब्रायन आणि मायकल गोल करु शकले नाहीत.
गोलकीपरची कमाल
अत्‍यंत चपळतेने गोल अडवणारा कोस्‍टारिकाचा नवास पेनल्‍टीशूटआऊटमध्‍ये गोल रोखू शकला नाही. तर नेदरलँडचा गोलकीपर क्रुलने आपल्‍या संघाच्‍या इच्‍छांना तडे न जावू देता अप्रतिम गोल रोखले. त्‍याच्‍याच बळावर नेदरलँडने 4-3 ने विजय मिळविला. सामन्‍यातील खरी लढाई ही गोलकीपरमध्‍येच पाहायला मिळाली.

पेनल्टी शूटआउटमध्‍ये लागलेले गोल (4-3)

* बोर्गेस (कोस्टा रिका) ने लगाया गोल
* वान पर्सी (नेदरलँड) ने गोल केला
* ब्रायन रुईज (कोस्टा रिका) गोल करु शकला नाही
* अर्जेन रॉबेन (नेदरलँड) ने गोल केला
* गेन कार्लो गोजालेज (कोस्टा रिका) ने गोल केला
* वेन स्नाइडर (नेदरलँड) ने गोल केला
* क्रिस्टेन बोलानोस (कोस्टा रिका) ने गोल केला
* डिर्क क्यूट (नेदरलँड) ने गोल केला
* माइकल उमाना (कोस्टा रिका) गोल करु शकला नाही
(फोटोओळ- पेनल्‍टी शुटआउटमध्‍ये गोल वाचविताना नेदरलॅंडचा गोलकीपर टी क्रूल)
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍याचे रोमहर्षक क्षण