आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा उपाध्यक्षांच्या मुलानेच केला घोटाळा, नेमारच्या वडीलांवरही आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रासिलिया - आतापर्यंत सुरळीत सुरू असलेल्या या विश्वचषकाला गालबोट लागले असून विविध सामन्यांच्या तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे विश्वचषक आयोजक संस्था फिफाचे उपाध्यक्ष ज्युलियो ग्रोनडोना यांचा मुलगा हम्बर्टो या घोटाळ्यात सहभागी आहे. त्याने हे मान्यही केले आहे.

हम्बर्टो या विश्वचषकासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहे. वास्तविक फिफाच्या नियमानुसार कोणत्याही पदाधिकार्‍यास तिकीट विक्री करता येत नाही. हम्बर्टो याने अर्जेंटिनाच्या एका वृत्तवाहिनीला सांगितले की, विविध प्रकारची सुमारे 9 हजार डॉलर्स किमतीची तिकिटे आपण विकत घेतली आणि ती एका मित्राला विकून टाकली. त्यानंतर त्या मित्राने तिकिटाचे काय केले हे आपल्याला माहीत नसून फक्त 220 डॉलर्ससाठी मी अशा प्रकारचे वाईट कृत्य करणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 11 लोकांना ताब्यात घेतले असून तब्बल 500 युरो पेक्षाही जास्त किमतीत तिकिटे विकली गेली असल्याचे सांगितले आहे.

नेमारचे वडीलही सहभागी
ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे. त्यामुळे सर्व चिंतित असतानाच नेमारच्या वडिलांवरही तिकिटाच्या काळाबाजारात सामील असल्याचा आरोप लावला जात असल्याने त्यात वाढ झाली आहे. ब्राझीलच्या एका वर्तमानपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, नेमारच्या वडिलांचे अल्जेरियातील व्यावसायिक ममादू लेमाइन फोफनाच्या टोळीशी संबंध आहे. फोफनाने विश्वचषक सामन्याचे तिकीट विकत घेण्यासाठी सुमारे तीन लाख युरोंची गुंतवणूक केली आणि त्यानंतर ही तिकिटे मोठ्या दराने विकली. 1970 मध्ये ब्राझीलबरोबर संयुक्तपणे विश्वचषक आयोजित करणारे कार्लोस अ‍ॅल्बटरे आणि ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डिन्होच्या भावाचेही या घोटाळ्यात नाव आढळून आल्याचे पोलिसांनी चौकशीनंतर सांगितले आहे. मात्र, नेमारच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.