आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pain Win 3 0 Against Australia Group B Soccer Match At The Baixada Arena, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : गतविजेत्‍या स्‍पेनची विजयी सांगता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्तिबा - गतविजेत्‍या स्‍पेनने फीफा वर्ल्‍डकपमध्‍ये अत्‍यंत वाईट सुरुवात झाली होती. प्रारंभीच्‍या नेदरलँड आणि चिलीविरुध्‍द त्‍यांचा दारूण पराभव झाला होता. अखेर त्‍यांची लय परत आली. आणि वर्ल्‍डकपमधून बाहेर जाताजाता का हाईना त्‍यांनी ऑस्‍ट्रेलियाला पराभूत करुन पहिला विजय नोंदविला.
विलाचे उत्‍कृष्‍ट प्रदर्शन
स्‍पेनने उत्‍कृष्‍ट प्रदर्शन करत ऑस्‍ट्रेलियाला 3-0 ने पराभूत केले. विला तीन वर्ल्‍डकपमध्‍ये गोल करणार तिसरा स्‍पॅनिश खेळाडू ठरला आहे. हाफ टाइममध्‍येच त्‍याने पहिला गोल नोंदवला. तर आंद्रेस इनिस्‍ताने 100 इंटरनॅशनल सामने पुरे केले. त्‍याने उत्‍कृष्‍ट पध्‍दतीने 69 व्‍या मिनीटाला गोल केला.
ऑस्‍ट्रेलियाकडून मॅट मॅकीने बरोबरी साधण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु तो गोल नोंदवू शकला नाही.
( फोटोओळ - गोलकीपरचा बचाव भेदून गोल करताना स्‍पॅनिश खेळाडू)
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यानची निवडक छायाचित्रे...