इंटरनॅशनल डेस्क - बाझीलच्या नागरिकांसाठी फुटबॉल जीवापेक्षाही अधिक प्रिय आहे. सध्या फुटबॉल विश्वचषक ब्राझीलमध्ये चालू आहे. स्टेडियमपासून रस्त्यांपर्यंत लोक फुटबॉल सामन्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. ब्राझील आणि फुटबॉल असे एक नवे समीकरण निर्माण झाले आहे. या कारणामुळे संपूर्ण ब्राझील फुटबॉलच्या रंगात रंगून गेला आहे आणि या व्यतिरिक्त येथे काही घडतच नाही, असे दिसत आहे. स्टेडियमध्ये येणा-या प्रत्येकजणाचा आनंद हा द्विगुणीत होत आहे. तसेच रस्त्यावरील आणि घरांमध्ये फुटबॉल सामने पाहाणा-या प्रेक्षकांचाही आनंद कमी नाही.
घर, कार्यालय, हॉस्पीटल किंवा रस्ता असो प्रत्येक ठिकाणी लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर लोकांच्या नजर खिळून राहिल्या आहेत. ब्राझील व्यतिरिक्त मेक्सिको, जर्मनी आणि व्हेनेझुएलासारख्या देशातही लोक फुटबॉल विश्वचषकाचा आनंद घेताना दिसत आहेत.
पुढील छायाचित्रांच्यामाध्यमातून फुटबॉल वर्ल्ड कपच्या सामने पाहाण्यासाठी ब्राझील आणि इतर देशात कसा फिव्हर चढला आहे....