बेरंकुएला - पॉप स्टार शकीराचा प्रियकर गेरार्ड पिकचा स्पेन संघ फीफा विश्वचषकामधून बाहेर पडला आहे. अशा वरिस्थितीत नाराज न होता शकीराने कोलंबिया संघाचा चिअर करणे सुरु केले आहे. उल्लेखनिय म्हणजे शकीरा मुळ कोलंबियाची आहे. तर गेरार्ड स्पेन कडून खेळतो.
कोलंबियाच्या सपोर्टची अपलोड केली छायाचित्रे
स्पॅनिश फुटबॉलर गेरार्ड पिकची लाईफ पार्टनर शकीराने स्पॅनिष भाषेमध्ये कोलंबियाला सपोर्ट दर्शविला आहे. तसा संदेशही तिने आपल्या
ट्विटरवर पोस्ट केला आहे. याशिवाय सोफियाने सुध्दा कोलंबियाला सपोर्ट दर्शविला आहे.
जेम्स रोड्रिगुइजची स्तुती
शकीरा आणि 41 वर्षीय मॉडेल सोफियाने कोलंबियाच्या रोड्रिगुइजची तोंडभरून स्तुती केली असून उपांत्यपूर्व सामन्यामध्ये ब्राझील विरोधात तो चांगली कामगिरी करु शकणार असल्याचा विश्वासही दाखविला आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, सोफिया आणि शकिराद्वारा पोस्ट केली गेलेली छायाचित्रे..