नेहमीप्रमाणे यावर्षीही फुटबॉल विश्वचषकामध्ये खेळाडूंना कामक्रीडेसाठी मान्यता द्यावी की, देवू नये यावरून बरेच मतमतांतरे झाली. काही प्रशिक्षकांनी तर खेळाडूंवर आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला विश्वचषकात न आनण्याचा सल्ला दिला. परंतु ज्या प्रशिक्षकांनी खेळाडूला विश्व चषकादरम्यान कामक्रीडा करण्यास मान्यता दिली असेच संघ आज सफल ठरल आहेत.
कामक्रीडेचा खेळावर परिणाम नाही
या विश्वचषकामधून बाहेर पडलेले बोस्निया, चिली आणि मॅक्सिको या संघाच्या प्रशिक्षकांनी खेळाडूंवर विश्व चषकादरम्यान कामक्रीडा करण्यावर बंदी घातली होती. तर उपांत्यफेरीमध्ये पोहोचलेले नेदरलँड, आणि जर्मनीसारख्या संघांच्या खेळाडूंना गर्लफ्रेंड आणि पत्नींना भेटण्याची तसेच कामक्रीडाची परावनगी होती. ब्राझीलच्या खेळाडूंना काही दिवसांनंतर एक दिवसाची सुटी देण्यात आली होती. ब्रॉझीलचे प्रशिक्षक स्कॉलरी यांनी म्हटले की, खेळाडूंनी नॉर्मल कामक्रीडा केल्यास खेळाडूला काही त्रास जानवत नाही किंवा थकावट येत नाही. त्यानी खेळाडूंना नॉर्मल कामक्रीडेविषयी सल्ला दिला होता.
खेळाडूंचे मत
ब्राझीलचा माजी फुटबॉलपटूचे म्हणने आहे की, सामन्यापूर्वी कामक्रीडा केल्याने त्याला आरामदायी आणि ताजेपणा वाटायचा. दिवंगत सोक्रटीसने एक वेळ म्हटले होते की, जेव्हा तो सामन्यापूर्वीच्या पहिल्या रात्री कामक्रीडा करायचो तेव्हा त्याचा परिणाम सामन्यावर चांगलाच असायचा. पोर्तुगालचा माजी फुटबॉलपटू कालाग्रांदेने म्हटले की, सामन्याच्या पुर्वी किंवा नंतर कामक्रीडा करणे काही वाईट गोष्ट नाही.
(फाइल फोटो: जर्मन फुटबॉलपटू गर्लफ्रेंड सारा समवेत)