आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किताब कायम ठेवण्याचे स्पेनसमोर आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गत चॅम्पियन स्पेन टीम सध्या जोरदार सराव करत आहे. या संघाने मागील चार वर्षांमध्ये तीन मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती. याच कामगिरीमुळे या टीमला चाहत्यांची मोठय़ा संख्येत पंसती आहे.

व्यवस्थापक विसेंट डेल बॉस्क्यू यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेनच्या टीमने वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉस्क्यू यांच्यामुळे सध्या स्पेनने युरोपातील बलाढय़ संघ असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र, या संघासमोर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये किताबावरचे वर्चस्व कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. चार वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा किताब पटकावून स्पेन टीमने सर्वांना एक बलाढय़ टीम असल्याचे सिद्ध केले.

टीममधील क्षमता
रेड आणि ब्ल्यू ड्रेसवर मैदानावर उतरणार्‍या स्पेन टीमचे मिडफील्डर हीच मजबूत बाजू आहे. जॉबी ओलोन्सा आणि सर्जियो ही जोडी मिडफील्डमध्ये आपल्या जादुई खेळीचे प्रदर्शन करतात. याशिवाय स्पेन संघाकडे जावी, इनिएस्टा, फ्रेब्रेगास आणि डेव्हिड सिल्वासारखे दिग्गज खेळाडूदेखील आहेत. हे सर्व खेळाडू स्पेनसाठी मॅचविनर मानले जाता

इनिएस्टावर खास नजर
फुटबॉलच्या विश्वात फारच कमी खेळाडू आहेत, जे पास करण्याची कला आणि डावपेच मैदानावरच आखतात. यातील एक हा बार्सलोनाचा मिडफील्डर इनिएस्टा आहे. त्यानेच दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत विजयी गोल करून स्पेन टीमला विश्वविजेत्याचा किताब मिळवून दिला होता. गत वर्ल्डकपप्रमाणेच यंदाही त्याच्याकडून अशा प्रकारच्या उल्लेखनीय कामगिरीची आशा केली जात आहे.

दुबळी बाजू
स्पेन संघाची फारशी दुबळी बाजू नाही. मात्र, कॉन्फेडरेशन चषकात ब्राझीलविरुद्ध सामन्यातील पराभवानंतर स्पेनची सुमार कामगिरी जगजाहीर झाली. यजमान टीमने स्पेनच्या मिडफील्डरला अनलॉक करण्याचा उपाय शोधून काढला. यात खास करून मिडफील्डर अमाडाचा समावेश आहे. याशिवाय सेंट्रल डिफेन्समध्ये सर्जियो रामोस आणि गेरार्ड पिकलादेखील काही खेळाडू चकवण्यात सक्षम आहेत.