आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uruguay\'s Star Suarez Banned For Four Months For Biting Chiellini, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिस्‍पर्धकाला चावणा-या सुआरेजवर फीफाची कारवाई, 4 महिने आणि 9 सामन्यांसाठी बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ डि जानेरो- फिफाने ब्राझीलमध्ये चालू असलेल्या फुटबॉल विश्‍व चषकामध्ये एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूच्या खांद्याचा चावा घेतल्याच्या प्रकारावर उरूग्वेचा आरोपी खेळाडू सुआरेजवर केली आहे. त्याला चार महिने आणि नऊ सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. फिफाच्या अनुशासन समितीने सुआरेजला विरोधी संघाच्या खेळाडूला चावा घेऊन, खेळाच्या नियमांचा अपमान करण्याच्या गैरप्रकार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. उरूग्वेने या निलंबनाच्या विरोधात याचिका दाखल करण्याचे ठरवले आहे.
चार महिन्यांचे निलंबन, विश्‍व चषकामधून बाहेर
फिफाने तत्काळ निर्णय घेऊन सुआरेजला निलंबित केले आहे. या निर्णयानंतर आता तो 28 जुलैला कोलंबियाच्या विरोधात होणाऱ्या महत्वाच्या सामन्यात खेळू शकणार नाहीये. फिफाच्या या निर्णयानंतर आता सुआरेजचा या विश्‍व चषकातील प्रवास संपला आहे. जरी उरूग्वेचा संघ क्वार्टर फायनल किंवा त्याच्या पुढच्या फेरीमध्ये पोहोचला तरी तो आपल्या संघासाठी खेळू शकत नाही.

याआधीही झाले आहे निलंबन
सुआरेजवर याआधीदेखील असे आरोप लागले आहेत. 2010 मध्ये अजाक्सकडून खेळत त्याच्यावर पीएसबी इंदोवेनच्या ओटमान बक्कालचा चावा घेण्याच्या आरोपाखाली दोषी आढळल्यामुळे सात सामन्यांसाठी बंदी आणली होती. गेल्यावर्षी लिव्हरपूलकडून खेळताना चेल्सीचा ब्रानिलसाव इवानोविकचा चावा घेण्याच्या आरोपाखाली त्याच्यावर 10 सामन्यांची बंदी आणण्यात आली होती.
काय म्हणाले अनुशासन समितीचे अध्यक्ष
फिफा अनुशासन समितीचे अध्यक्ष क्लाऊडियो सुल्सरने आपल्या निवेदनात सांगितले की, "फुटबॉलच्या मैदानावर खासकरून विश्‍वचषकातील सामन्यांच्या वेळी, जेव्हा लाखो दर्शकांचे डोळे मैदानाकडे लागलेले असतात तेव्हा असे गैरवर्तन सहन केले जाणार नाही."
काय होती नेमकी घटना?
24 जूनला नटालच्या एस्टेडियो डास डूनास मैदानावर ग्रुप-डीच्या शेवटच्या सामन्यात जॉर्जियो चिलिनीच्या खांद्याला चावा घेतला होता. उरूग्वे हा सामना 1-0ने जिंकला होता तर इटलीचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला होता.
(फोटो- इटलीच्या चिलीनोला दातांनी चावताना उरूग्वेचा सुआरेज(वर्तूळात))
पुढच्या स्लाइड्सवर पहा, घटनेचा व्हिडीयो आणि फोटोज्....