आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डन टेनिस स्पर्धा: योकोविकचा रोमांचक विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अव्वल मानांकित नोवाक योकोविकने गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत धडक मारली. त्याने पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत चेक गणराज्यच्या रांदेक स्तेपानेकविरुद्ध 6-4, 6-3, 7-6, 7-6 ने रोमांचक विजय मिळवला. आता योकोविकचा सामना फ्रान्सच्या सिमोनशी होईल.
रंदावास्का, क्वितोवा तिसर्‍या फेरीत : अझारेंका, रंदावास्का व सहाव्या मानांकित पेत्रा क्वितोवाने महिला एकेरीच्या तिसर्‍या फेरीत धडक मारली. रंदावास्काने ऑस्ट्रेलियाच्या डेल्लासीक्युआला 6-4, 6-0 ने हरवले. पेत्रा क्वितोवाने बार्थेलवर 6-2, 6-0 ने मात केली.
सानिया-ब्लॅकची विजयी सलामी : भारताची सानिया मिर्झाने कारा ब्लॅकसोबत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत दमदार विजय मिळवला. या चौथ्या मानांकित जोडीने सलामी सामन्यात बिगरमानांकित एम. हिंगीस आणि व्ही. जोनारेवाचा पराभव केला. सानिया-ब्लॅकने 6-2, 6-4 अशा फरकाने सामना जिंकला.