आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup 2014 : Algeria Beat South Korea In Group H Soccer Match

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्जेरियाचा दक्षिण कोरियावर धमाकेदार विजय, 4-2 ने केली मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्टे अलेग्रे - 20 व्या फिफा विश्वचषकातील ग्रुप एच मधील अल्जेरीयाने दक्षिण कोरियावर 4-2 असा एकतर्फी विजय मिळविला आहे. अल्जेरीयाकडून इस्लाम स्लिमानी, रफीक हलिचे, अब्देल मौमिने आणि याचिन ब्राहिमी यांनी गोल केले. या विजयासह अल्जेरिया नॉकाऊट फेरीत दाखल झाले आहे. याआधी बेल्जियमकडून त्यांचा 2-1 ने पराभव झाला होता.
32 वर्षानंतर विजय
अल्जेरीया हा एखाद्या अफ्रिकी देशाने विश्वचषकात चार गोल करणारा पहिला संघ ठरला आहे. अल्जेरीयाने 32 वर्षांनंतर (1982) एवढा मोठा विजय मिळविला आहे. आता त्यांचा सामना रशियासोबत होणार आहे. अल्जेरियाला आता तीन गुण मिळाले असून दुस-या स्थानावर आला आहे. या ग्रुपमध्ये बेल्जियम अव्वलस्थानी आहे. रशिया आणि कोरिया क्रमशः तिसर्‍या आणि चौथ्या स्थानी आहे.