आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup 2014, Algeria Beat South Korea In Group H Soccer Match

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...अन् पोर्तुगालचा पराभव टळला; अल्जेरिया 34 वर्षांनतर विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनौस - सोमवारी पहाटे 3.30 वाजता पोर्तुगाल आणि अमेरिकेदरम्यानची लढत रोमहर्षकतेचा कळस गाठणारी ठरली. सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत 2-1 ने आघाडीवर असलेल्या अमेरिकेने ही लढत जवळपास जिंकल्यातच जमा होती; पण त्याच वेळी पोर्तुगालचा बदली खेळाडू सिल्व्हेस्टर वारेलाने एक अप्रतिम हेडर करत संघाला चक्क पराभवाच्या दाढेतून बाहेर काढले आणि ही उत्कंठावर्धक लढत 2-2 ने अनिर्णीत ठरली. मात्र, या ड्रॉमुळे अमेरिकेचे नॉकआऊटमध्ये पोहोचण्याचे स्वप्न लांबणीवर पडले. यापूर्वी 2002 मध्ये अमेरिकेने पोर्तुगालला 3-2 ने हरवून क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली होती.

अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या लढतीत सामन्याच्या पाचव्या मिनिटाला नानीने गोल करून पोर्तुगालला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 45 व्या मिनिटाला नानीने पुन्हा एकदा दुरूनच गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमेरिकेचा गोलकिपर टीम हावर्डने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. या आघाडीने सामना दुसर्‍या हाफ मध्ये पोहोचला. मात्र, 64 व्या मिनिटाला अमेरिकेच्या जर्मेन जोन्सने शानदार गोल करून सामना 1-1 ने बरोबरीत आणून सोडला.
डेम्पसीचा निर्णायक गोल
त्यानंतर बराच वेळ दोन्ही संघ संघर्ष करताना दिसले. मात्र, सामना संपायला 9 मिनिटे शिल्लक असताना क्लायंट डेम्पसीने अमेरिकेला 2-1 ची निर्णायक आघाडी मिळवून दिली. शेवटच्या क्षणी मिळालेल्या या आघाडीमुळे अमेरिकेचा संघ विजयाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला होता. मात्र, दुखापतग्रस्त असलेला पोर्तुगालचा स्टार खेळाडू रोनाल्डोने गोलची संधी निर्माण करत बदली खेळाडू वादेलाकडे एक पास दिली. वादेलाने या संधीचा पुरेपूर फायदा उचलत अगदी शेवटच्या क्षणी गोल करून सामना ड्रॉ केला आणि मैदानात एकच जल्लोष झाला.
रोनाल्डोची जादू ओसरली
विश्वचषकात पोर्तुगालकडून सर्वाधिक 12 सामने खेळणार्‍या रोनाल्डोला स्पध्रेत आतापर्यंत सूर गवसला नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याच्या कामगिरीवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या सामन्यात वारेलाला केलेला पास वगळता त्याने काहीच केले नाही.
0फिफा विश्वचषक स्पध्रेतील सामन्यांच्या ताज्या निकालासाठी वाचत राहा ‘दिव्य मराठी ई-पेपर’
पोर्तुगालच्या सिल्व्हेस्टर वारेलाने केलेल्या अप्रतिम हेडरकडे पाहताना अमेरिकेचा गोलकिपर टीम हॉवर्ड. सामन्याचा निकाल ठरवण्यात वारेलाचा हाच गोल कारणीभूत ठरला.
संकटमोचक वारेला
विश्वचषकाच्या सोमवारच्या लढतीत पोर्तुगालसाठी संकटमोचक ठरलेल्या वारेलाने यापूर्वीसुद्धा अशा प्रकारची कामगिरी केली आहे. 2012 च्या युरो चषक स्पध्रेत डेन्मार्कविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत त्याने 87 व्या मिनिटाला गोल करून संघाला विजय मिळवून दिला होता.
हॉलंड संघाची विजयी हॅट्ट्रिक, चिलीचा 0-2 ने पराभव
साओ पावलो - जबरदस्त फॉर्मात असलेल्या हॉलंडने सोमवारी रात्री फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. या संघाने बी ग्रुपच्या आपल्या तिसर्‍या सामन्यात चिलीचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. स्टार मिडफील्डर लेरोय फेर (77 मि.) आणि मेफिस डेपी (90+2 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर हॉलंडने सामना जिंकला. यासह गत उपविजेत्या हॉलंडने नऊ गुणांसह अव्वल स्थान अधिक मजबूत केले. तसेच ग्रुप सामन्यातील हॉलंडचा हा शेवटचा तिसरा सामना होता. दुसरीकडे चिलीचा स्पर्धेतील हा पहिला पराभव ठरला. गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी असलेल्या चिलीचे सहा गुण आहेत.
स्पेनचा शेवट गोड; ऑस्ट्रेलियावर मात, बी ग्रुपमध्ये स्पेन 3-0 ने विजयी
क्युरिटिबा - पराभवाच्या गर्र्तेत सापडलेल्या गतविजेत्या स्पेन संघाने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील बी ग्रुपमधील आपल्या शेवटच्या सामन्यात प्रतिष्ठा जपली. या संघाने ग्रुपच्या तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 3-0 अशा फरकाने पराभव केला. डेव्हिड व्हिला (36 मि.), फर्नांडो टोरेस (69 मि.) आणि जुआन माटा (82 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून स्पेनला एकतर्फी विजय मिळवून दिला. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाचा यंदाच्या वर्ल्डकपमधील हा सलग तिसरा पराभव ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात चिलीने व दुसर्‍या सामन्यात हॉलंडने पराभूत केले होते.