आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2014: Belgium Win Thriller Over US After Extra Time

FIFA WC : तब्बल 28 वर्षांनंतर बेल्जियम उपांत्यपूर्व फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साल्वाडोर - बेल्जियम संघाने तब्बल 28 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाची स्वप्नपूर्ती केली. जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर असलेल्या बेल्जियमने मंगळवारी मध्यरात्री अमेरिकेचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. यापूर्वी बेल्जियमने 1986 मध्ये वर्ल्डकपची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतर या संघाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये हे चमकदार यश संपादन केले.

केविन डी ब्रुयने (93 मि.) आणि रोमेलू लुकाकू (105 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर बेल्जियमने सामना जिंकला. या विजयासह बेल्जियमने अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित केला. आता बेल्जियमचा उपांत्यपूर्व सामना 5 जुलै रोजी अर्जेंटिनाशी होईल. बेल्जियम आणि अमेरिका यांच्यातील प्री-क्वार्टर फायनलचा सामना अधिकच रोमांचकपणे रंगला होता. दोन्ही संघांनी केलेल्या बचावात्मक खेळीमुळे निर्धारित वेळेपर्यंत सामना गोलरहित खेळवला गेला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत डी. ब्रुयनेने बेल्जियमला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्याने अमेरिकेचा गोलरक्षक टीम होवर्डला हुलकावणी देऊन गोलचे खाते उघडले. ब्रुयनेने सात मीटरच्या अंतरावरून चेंडूला गोलपोस्टमध्ये पाठवले. त्यानंतर स्टार स्ट्रायकर रोमेलू लुकाकूने दुसरा गोल केला.

डेम्पसी अपयशी : अमेरिकेचा क्लाइंट डेम्पसी सपशेल अपयशी ठरला. त्याने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या. तसेच 107 व्या मिनिटाला गोल करून विजयाची आशा पल्लवित केली होती. मात्र, वेळे अभावी अमेरिकेला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे अमेरिकाला बाहेर पडावे लागले.
(फोटो - बेल्जियमच्या ब्रुयनेने अमेरिकेच्या होवर्डला चुकवून मारलेला चेंडू गोलपोस्टमध्ये जाताना)