आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup 2014: Brazil Win 4 1 Against Cameroon Group A Soccer Match

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA World Cup : ब्राझील 4-1 ने विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रासिलिया - पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील संघाने आपल्या करिअरमधील 100 व्या सामन्यात डबल धमाका उडवला. यजमान संघाने सोमवारी मध्यरात्री ए ग्रुपच्या लढतीत कॅमरूनचा 4-1 ने पराभव केला. याबरोबरच ब्राझीलने स्पर्धेतील अंतिम 16 संघांतील प्रवेश निश्चित केला. शंभराव्या सामन्यात हा ब्राझीलचा 69 वा विजय ठरला.

वेगवान स्ट्रायकर नेमार ज्युनियरने (17, 35 मि.) केलेल्या गोलच्या बळावर ब्राझीलने सामना जिंकला. यासह फ्रेडने यंदाच्या वल्र्डकपमध्ये आपल्या नावे चार गोलची नोंद केली. तसेच फ्रेड (49 मि.), फर्नांडिन्हो (84 मि.) यांनीही संघाच्या विजयात प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले. दुसरीकडे सलगच्या तिसर्‍या पराभवासह कॅमरूनचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या ब्राझीलने घरच्या मैदानावर कॅमरूनविरुद्ध लौकिकास साजेशी खेळी केली. दरम्यान, कॅमरूननेही बलाढय़ ब्राझीलला घरच्या मैदानावर रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हुल्क, ऑस्कर, नेमार व फ्रेड यांनी धडाकेबाज खेळी करून कॅमरूनचा 4-3-3 चे डावपेच उधळून संघाला विजय मिळवून दिला.

मेक्सिको अंतिम 16 मध्ये
मेक्सिको संघाने फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम 16 संघात धडक मारली. या संघाने सोमवारी मध्यरात्री क्रोएशियाला 3-1 अशा फरकाने धूळ चारली. मारक्युइझ (72 मि.), गुराडाडो (75 मि.), हर्नांडेझ (82 मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर मेक्सिकोने ए ग्रुपमधील दुसरा सामना जिंकला. क्रोएशियाकडून पेरिसिकने 87 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. लढत मध्यतरांपर्यंत शून्य गोलने बरोबरीत होती. दुसर्‍या हाफमध्ये मेक्सिकोने पुनरागमन करून विजय निश्चित केला.


नेमारची कामगिरी
नेमारची दमदार सुरुवात : घरच्या मैदानावर सुरेख खेळी करत नेमारने ब्राझीलला दमदार सुरुवात करून दिली. त्याने 17 व्या मिनिटाला गुस्तावोने दिलेल्या क्रॉस पासवर दोन डिफेंडर्सना हुलकावणी देऊन गोल केला. यासह त्याने ब्राझीलला 1-0 ने आघाडी मिळवून दिली.