आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup 2014: Brazil Win 4 1 Against Cameroon Group A Soccer Match, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC: नेमारच्‍या दोन शानदार गोलच्‍या जोरावर ब्राझीलने कॅमरुनचा उडविला धुव्‍वा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रासिलीया - पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील संघाने आपल्या करिअरमधील 100 व्या सामन्यात डबल धमाका उडवला. यजमान संघाने सोमवारी मध्यरात्री फिफाच्या विश्वचषकातील ए ग्रुपमधील आपल्या तिसर्‍या सामन्यात कॅमरूनचा 4-1 अशा फरकाने पराभव केला. या विजयाच्या बळावर ब्राझीलने स्पर्धेतील अंतिम 16 संघातील आपल्या प्रवेश निश्चित केला. तसेच यजमान संघाने आपला शतकी सामना 69 व्या विजयाने साजरा करण्याचा दुहेरी योगही जुळवून आणला.
स्टार वेगवान स्ट्रायकर नेमार ज्युनिअरने (17, 35 मि.) केलेल्या गोलच्या बळावर ब्राझीलने सामना जिंकला. यासह फ्रेडने यंदाच्या वल्र्डकपमध्ये आपल्या नावे चार गोलची नोंद केली. तसेच फ्रेड (49 मि.), फर्नांडिन्हो (84 मि.) यांनीही संघाच्या विजयात प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले. दुसरीकडे सलगच्या तिसर्‍या पराभवासह कॅमरूनचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या ब्राझील संघाने आपल्या घरच्या मैदानावर कॅमरूनविरुद्ध लौकिकास साजेशी खेळी केली. दरम्यान, कॅमरून संघानेही बलाढय़ ब्राझीलला घरच्या मैदानावर रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हुल्क, ऑस्कर, नेमार व फ्रेड यांनी धडाकेबाज खेळी करून कॅमरूनचा 4-3-3 चा डावपेच उधळून संघाला विजय मिळवून दिला. सर्वाधिक वेळ चेंडूवर नियंत्रण मिळवून ब्राझील संघाने कॅमरूनच्या खेळाडूंना चांगलेच झुंजवले. त्यामुळे माटिपने केलेला गोल कॅमरूनचा एकमेव ठरला.
मेक्सिको अंतिम 16 मध्ये
मेक्सिको संघाने फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम 16 संघात धडक मारली. या संघाने सोमवारी मध्यरात्री क्रोएशियाचा 3-1 अशा फरकाने धुळ चारली. मारक्युइझ (72 मि.), गुराडाडो (75 मि.), हर्नांडेझ (82 मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर मेक्सिकोने ए ग्रुपमधील दुसरा सामना जिंकला. क्रोएशियाकडून पेरिसिकने 87 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
हॉलंड संघाची विजयी हॅट्ट्रिक
जबरदस्त फॉर्मात असलेल्या हॉलंडने सोमवारी रात्री फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. या संघाने बी ग्रुपच्या आपल्या तिसर्‍या सामन्यात चिलीचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. स्टार मिडफील्डर लेरोय फेर (77 मि.) आणि मेफिस डेपी (90+2 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर हॉलंडने सामना जिंकला. यासह हॉलंडने नऊ गुणांसह अव्वल स्थान अधिक मजबूत केले.
(फोटोओळ - गोल केल्‍यानंतर आनंद व्‍यक्‍त करताना ब्राझीला नेमार)
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यानची निवडक छायाचित्रे...