आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup 2014 : Croatia Win 4 0 Cameroon Their Group A Soccer Match

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA : क्रोएशियाचा कॅमरूनवर जोरदार विजय; अंडर 16 मध्ये पोहचण्याच्या आशा पल्लवीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कॅमेरूनचे खेळाडू ऑरेलियन चेजाऊ (डावीकडून) आणि क्रोएशियाचे खेळाडू समीर चेंडू मिळवण्यासाठी चालू असलेली कसरत)

मनॉस - 20 व्या फीफा विश्वचषकामध्ये 'गट ए'च्या एका सामन्यात क्रोएशियाने चांगली खेळी करत कॅमेरूनचा 4-0 ने पराभव केला. क्रोएशियाला त्याच्या पहिल्या सामन्यात ब्राझीलकडून 3-1 ने पराभव पत्करावे लागले. हा त्यांचा दुसरा सामना होता. या विजयी खेळीनंतर स्पर्धेत टिकण्याच्या क्रोएशिया आशा आता पल्लवित झाल्या आहेत. क्रोएशियाच्या या विजयाचे शिल्पकार म्हणजे फॉरवर्ड मारिओ मंडजुकीक. मंडजुकीकने या स्पर्धेत दोन गोल केले, तर ओलिस आणि पेरसिक यांनी एक-एक गोल केला.

एकतर्फी स्पर्धा, क्रोएशियाच्या खेळाडूंची जबरदस्त खेळी
'गट ए' च्या या स्पर्धेत क्रोएशियाच्या खेळाडूंचीच चलती होती. क्रोएशियाने सुरूवातीलाच आघाडी घेत ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली आणि एकही गोल होऊ दिला नाही. या जोरदार विजयामुळे क्रोएशियाच्या अंडर -16 मध्ये पोहचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सामन्या दरम्यान कॅमेरूनच्या खेळाडूंना जास्त संधी मिळाली नाही, आणि ज्या संधी मिळाल्या त्यांचा फायदा त्यांना घेता आला नाही.

पहिल्या सत्रातच एक गोल, ओलिसने घेतली आघाडी
सामन्याच्या पहिल्या सत्रात क्रोएशियाने एक गोल केला. खेळाच्या 11 व्या मिनिटाला ओलिसने वळन घेत एका जोरदार फटक्याच्या साह्याने चेंडू जाळीमध्ये पोहचवला. हा गोल डी च्या अत्यंत जवळून करण्यात आला होता. या गोलमुळेच क्रोएशियाने कॅमेरून विरोधात 1-0 ची आघाडी घेतली. यानंतर पहिल्या सत्रात कोणताच गोल झाला नाही.

दूसर्‍या सत्रात झाले तीन गोल
सामन्याच्या पहिल्या सत्रापेक्षा दुसर्‍या सत्रात क्रोएशियाचे खेळाडू जास्त अक्रामक होते. या सत्रात क्रोएशियाने एकापाठोपाठ एक असे तीन गोल केले. 48 व्या मिनिटाला इवान पॅरसिकने गोल करून ही आघाडी दुप्पट केली. तर कॅमेरूनच्या खेळाडूंना सावरायला वेळही मिळत नाही तोच, 61 व्या मिनिटाला क्रोएशियाकडून आणखी एक गोल करण्यात आला. हा गोल संघाचा विजयी खेळाडू मारिओ मंडजुकीकने केला.

उरल्या-सुरल्या इच्छाही केल्या पुर्ण - मारिओ
सामना अजून संपला नव्हता. मारीओची विजयी खेळी अजून बाकी होती. 69 व्या मिनिटाला ओलिस बाहेर गेल्यानंतर पुढील सर्व जबाबदार्‍या संभाळणार्‍या मारिओ मंडजुकीकने चौथा गोल केला. हा गोल 73 व्या मिनिटाला करण्यात आला.

पुढील स्लाईडवर पहा... या सामन्याची काही निवडक क्षणचित्रे...