आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup 2014 : Germany Draw With Ghana During Their Group G Soccer Match At The Castelao Arena

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्मनीने घानाला रोखले, 2-2 ने लढत बरोबरीत, दोन्ही संघास प्रत्येकी एक गुण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्टलेझा - जबरदस्त फॉर्मात असलेल्या जर्मनीने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी मध्यरात्री घानाला 2-2 अशा गोल फरकाने बरोबरीत रोखले. मिरोस्लाव क्लोजने 71 व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर जर्मनीचा पराभव टळला. सामना अनिर्णीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. जर्मनीकडून क्लोजशिवाय मारियो गोटेझनेही 51 व्या मिनिटाला गोल केला. घानाकडून ए.अवेई याने 54 व्या तर ग्यानने 63 व्या मिनिटाला गोल केला. जर्मनीचा तिसरा सामना गुरुवारी अमेरिकेविरुद्ध होईल. ग्रुप ‘जी’मध्ये जर्मनी 4 गुणांसह अव्वल तर अमेरिका एका विजयासह दुसर्‍या स्थानावर आहे.

सलामीच्या लढतीत मिळालेल्या विजयाने आवेशात असलेल्या जर्मनीने घानाविरुद्धच्या सामन्यात दमदार सुरुवात केली. दुसरीकडे विजयासाठी उत्सुक असलेल्या घानानेही जर्मनीच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत ही लढत शून्य गोलने बरोबरीत होती. दरम्यान, जर्मनीच्या प्रशिक्षकाने अनुभवी क्लोज आणि स्वांसटायगर या दोन हुकमी एक्क्यांना वापरण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षकांच्या निर्णयाचा सन्मान करत क्लोजने शानदार गोल करून संघाचा पराभव टाळला.

जर्मनीचे पुनरागमन
पहिल्या हाफमध्ये आक्रमण करूनही यश न मिळाल्याने निराश जर्मनीच्या संघाने मध्यंतरानंतर दमदार पुनरागमन केले. मारिया गोटेझेने 51 व्या मिनिटाला गोल करून संघाचे गोलखाते उघडले. घानाच्या गोलरक्षकाला हुलकावणी देऊन त्याने नेत्रदीपक असा गोल केला. बदली खेळाडूच्या रूपात मैदानात उतरलेला जर्मनीचा स्टार खेळाडू क्लोजने 71 व्या मिनिटाला गोल करून संघावरील पराभवाचे सावट दूर केले. या गोलच्या बळावर त्याने पिछाडीवर असलेल्या जर्मनीला 2-2 ने बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी बचावात्मक खेळाला प्राधान्य देत सामना अनिर्णीत अवस्थेत पोहोचवला.

विश्वविक्रमाच्या ‘ क्लोज’ मिरोस्लाव्ह
जर्मनीचा स्टार मिरोस्लाव्ह क्लोजने शनिवारी मध्यरात्री घानाविरुद्धच्या लढतीत एक गोल करून एका नव्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 15 गोल करण्याच्या विक्रम आतापर्यंत ब्राझीलच्या रोनाल्डोच्या नावे होता. मात्र, क्लोजने शनिवारी अप्रतिम गोल करत या विक्रमाला गवसणी घातली. रोनाल्डोने विश्वचषकाच्या 19 सामन्यात हा विक्रम नोंदवला. क्लोजने यासाठी 20 सामने खेळले. तो चौथ्यांदा विश्वचषकात जर्मनीचे प्रतिनिधित्व करत आहे. 2002 व 2006 च्या विश्वचषकात प्रत्येकी 5 आणि मागच्या विश्वचषकात 4 गोल केले होते. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये क्लोजला शनिवारी घानाविरुद्धच्या लढतीत 69 व्या मिनिटाला बदली खेळाडूच्या रूपात मैदानावर उतरण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत क्लोजने रोनाल्डोच्या विक्रमाची बरोबरी साधली.

अवेई, ग्यान यांचा प्रत्येकी एक गोल
पिछाडीवर पडलेल्या घानाने गोलसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. अखेर, 54 व्या मिनिटाला अवेईने घानाकडून पहिला गोल केला. यासह त्याने लढतीत संघाला 1-1 ने बरोबरीत मिळवून दिली. त्यानंतर ग्यानने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये घानाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. त्याने 63 व्या मिनिटाला हे यश गवसले. मात्र, त्यांना घानाला विजय मिळवून देता आला नाही.

नायजेरिया 1-0 ने विजयी
नायजेरियाने विश्वचषकाच्या एफ गु्रपमध्ये रविवारी पहाटे विजयाचे खाते उघडले. त्याने स्पर्धेतील आपल्या दुसर्‍या सामन्यात बोस्नियाचा 1-0 अशा फरकाने पराभव केला. पीटरने 29 व्या मिनिटाला गोल करून नायजेरियाला विजय मिळवून दिला. नायजेरियाने चार गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे.