आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2014: Gonzalo Higuain Goal Secures Argentina Win Over Belgium

अर्जेंटिना 1990 नंतर प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रासिलिया - स्ट्रायकर गोंजालो हिगुइन याने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर अर्जेंटिनाने बेल्जियमला 1-0 ने पराभूत करत विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. 1990 नंतर प्रथमच अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

प्रतिष्ठेची लढाई असलेल्या या सामन्याच्या आठव्याच मिनिटाला डी.मारियाच्या शानदार पासवर गोंजालो हिगुइनने चेंडूला डाव्या पायाने हवेतून भिरकावत थेट गोलपोस्टचा रस्ता दाखवला. हा गोल इतका जबरदस्त होता की बेल्जियमचा गोलकीपर थिबोट कोरटोइस याला चेंडू नेमका कसा गोलपोस्टमध्ये गेला हे कळलेच नाही. यामुळे मिळालेल्या 1-0 च्या आघाडीनंतर सुपरस्टार लियोनेल मेसीने आक्रमकपणा अवलंबत अनेकदा गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपयश आले.

दरम्यान, बेल्जियमच्या खेळाडूंनीही गोलसाठी अथक पर्शिम केले. मात्र, त्यांची पाटी कोरीच राहिली. मिडफील्डर डी.ब्रुएने 25 मीटर अंतरावरून चेंडूला गोलपोस्टचा रस्ता दाखवला. मात्र, चेंडू त्याच्या कडेला लागून बाहेर गेला. हिगुइन आणि मेसीने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपले वर्चस्व बनवले होते. यासाठी संघातील अन्य खेळाडूंशी त्यांचा चांगला समन्वय दिसून आला.

सामन्याच्या दुसर्‍या हाफमध्ये हिगुइन पुन्हा एकदा गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. परंतु या वेळी तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर केव्हिन मिरालास आणि मारुआने फैलानी यांनी हेडरच्या माध्यमातून केलेले गोलचे प्रयत्नसुद्धा धुळीस मिळाले. संघाचा मुख्य मिडफील्डर अँडेन हजार्ड शनिवारी पूर्णपणे फ्लॉप ठरला. दोन्ही संघांनी या सामन्यात 4-2-3-1 ची शैली अवलंबली होती. त्यामुळे डिफेंडर्सना मॅन टू मॅन मार्किंग करण्यात कोणताही अडथळा आला नाही. स्ट्रायकर्सही यामुळे फारशी चमक दाखवू शक ले नाहीत.

(फोटो - अर्जेंटिनाचा स्ट्रायकर गोंजालो हिगुइनने अप्रतिम शॉट मारत सामन्यात एकमेव गोल केला. या गोलच्या बळावरच अर्जेंटिनाला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवता आले.)