साओ पाअलो: फिफा वर्ल्ड कप 2010 ची उपविजेत्या नेदरलँडने शेवटच्या सामन्यात चिलीला 2-1 ने पराभव करून आपले विजयी स्थान कायम ठेवले आहे. विजेत्या टीमकडून लागलेले दोन्ही गोल राखीव खेळाडूंच्या नावावर झाले आहेत. नेदरलँडच्या रॉय फेर आणि मेंफिस डीपे या दोघांनी मैदानावर उतरताच आपल्या टीमसाठी शानदार गोल केले.
या दोन गोलमुळे नेदरलँडने चिलीवर 2-0 ने विजय मिळवत ग्रुप बीमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान प्राप्त केले आहे. यात आर्येन रॉबेनने महत्वाची भूमिका बजावली आहे. फेरने 77व्या मिनिटाला टीमसाठी पहिला गोल केला. रॉबेनचा दणदणीत क्रॉस बॉक्सच्या आत आला, फेरने उडी मारून शानदार हेडर शॉट लगावला बॉल चिलीचा गोलकीपर क्लाडियो ब्रावोलाचकवा देत सरळ गोलमध्ये पोहोचला. कर्णधार ऱॉबिन वास पर्सी स्टँडवरून याची प्रशंसा करताना दिसला.
युवा खेळाडू मेंफिसने सामना संपायच्या दोन मिनिटापूर्वी दुसला गोल केला. रोबेन डावीकडून वेगाने ड्रब्रिंग करता आला आणि त्याने या 20 वर्षीय खेळाडूला खालचा क्रॉस दिला. त्याने याचे गोलमध्ये रूपांतर केले. या निकालामुळे हॉलंड ब्राझीलला भिडण्यापासून वाचण्याची अपेक्षा आहे, ग्रुप-बी मध्ये ब्राझीलियात कॅमेरूनच्या विरोधात सामना होईल. .
ग्रुपमध्ये टॉपला नेदरलँड, तिन्ही सामन्यात विजय
नेदरलँड आणि चिली या दोन्ही संघाने ऑस्ट्रेलिया आणि विजेत्या स्पेनवर विजय मिळवून दुसर्या फेरीत प्रवेश मिळवला होता. दुसर्या फेरीत नेदरलँड 9 गुणांनी तर चिली 6 गुणांनी पुढे आहे.
नेदरलँडचे प्रशिक्षक लुई यांची क्लृप्ती आली कामाला
नेदरलँडचे प्रशिक्षक लुई ववान गाल यांची दोन राखीव खेळाडूंना मैदानात उतरवल्यामुळे संघाला फायदा झाला. फॉर्मात नसलेल्या वेस्ली स्नाइडर आणि जर्मेन लेंसच्याऐवजी नॉर्विच सिटीचा फेर आणि पीएसवी इंधोवेनचा मेंफिस यांना मैदानात उतरवण्यात आले. हे ओरांजे’ ब्रिगेडसाठी महत्वाचे पाऊल ठरले. मेंफीसने गोलच्याआधी 25 पावलांच्या अंतरावरून केलेला प्रयत्न ब्रावोने थोपविला, त्यामुळे टीमला कॉर्नर मिळाला. पण पुढच्याच मिनिटाला गोलकीपर कच्चा पडला.
दोन्ही संघाचा प्रबळ बचाव, थोपवले अनेक गोल
नेदरलँडला निलंबनामुळे सामना न खेळू शकलेला आपला कर्णधार रॉबिन वान पर्सीची कमतरता जाणवली. दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केला. आर्येन रॉबेनवर बरेच दडपण दिसत होते आणि त्यातच त्याने 40व्या मिनिटाला एक शानदार गोल करण्याची सुवर्णसंधी गमावली. ऱॉबेनने आपल्या वेगाने डिफेंडर चार्ल्स अरांगुइज आणि गैरी मेडेल यांना चकवून पुढे गेला, आणि डाव्या पायाने मारलेल्या शॉट लक्ष्यावर जाण्यापासून काही इंचांनी वाईड गेला. चिलीला पहिल्या हाफमध्ये बढती मिळवता आली असती, परंतू फेलिपे गुटिरेज मार्सेलो डियाची फ्री गोलमध्ये पोचवण्यात अयशस्वी ठरला.
हाफ टाइमपर्यंत स्कोर राहिला 0-0
ब्रेकपर्यंत दोन्ही टीम्स गोलरहित आणि बरोबरीवर होत्या. यानंतर मात्र सांचेजमध्ये नवीन उत्साह दिसला. त्याने ऑरंजोच्या डिफेंडर्सना खुप त्रास दिला. 65व्या मिनिटाला रोबेन बॉल घेऊन विरोधी टीमच्या बॉक्समध्ये पोचला, परंतू त्याचा शॉट पूर्ण होऊ शकला नाही.
77व्या मिनटाला झाला पहिला गोल
नेदरलँडकडून लेरॉयने पहिला गोल केला. सामन्याच्या 77व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या मदतीने नेदरलँडच्या चिलीच्या विरोधात 1-0 ची बढती मिळाली. दुसरा गोल सामना संपायच्या काही मिनिटं आधी इंजुरी टाइम(90+2) मध्ये झाला. हा गोल निर्णायक ठरला.
(फोटोओळ- नेदरलँडचा लेरॉय फेर (मध्यभागी) चिलीच्या विरोधात गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना)
पुढच्या स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सामन्याचे फोटो