पोर्तुगाल संघाचा 'वन मॅन आर्मी' असलेला खेळाडू क्रिस्टीयानो रोनाल्डो पुन्हा एकदा गोल बनविण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या सामन्यामध्येही त्याला गोलचे खाते खोलता आले नाही. सामना सुरु होईपर्यंत रोनाल्डो खेळणार की नाही याविषयी निश्चित नव्हते.
पोर्तुगाल संघाचा वर्ल्डकपमधील दुसरा सामना बरोबरीत राहीला. यासह पोर्तुगालला 2 गुणांवर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या पोर्तुगाल आणि अमेरिका यांच्यात सोमवारी पहाटे रंगलेला सामना 2-2 ने बरोबरीत राहीला. नानी (5 मि.) आणि एस. वारेला (90+5 मि.) यांनी गोल करून पोर्तुगालचा पराभव टाळला.अमेरिकेकडून जे.जोन्स (64 मि.) आणि सी. डेम्पसी (81 मि.) यांनी गोल केले. अमेरिकेचा हा पहिला सामना बरोबरीत राहीला. यासह अमेरिका संघाला एका गुणावर समाधान मानावे लागले.
जी ग्रुपमध्ये अमेरिकेने चार गुणांसह दुसरे स्थान गाठले. तसेच रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ 1 गुणासह तळात चौथ्या स्थानावर आहे. आता पोर्तुगालचा तिसरा सामना गुरुवारी घानाशी होईल. यापूर्वी, पोर्तुगाल जर्मनीने 4-0 ने पराभूत केले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरम्यानची निवडक छायाचित्रे....