Home | Sports | Football | Cristiano Ronaldo Shown Again That He Is A Hero Both On And Off The Field

रोनाल्डोसाठी रडत होता छोटा Fan, बसमधून उतरून केले असे काही...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 18, 2018, 12:22 PM IST

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पहिली हॅट्ट्रिक लावणारा पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो याने पुन्हा आपण मैदानाबाहेरही हिरो असल्य

 • Cristiano Ronaldo Shown Again That He Is A Hero Both On And Off The Field

  स्पोर्ट्स डेस्क - फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पहिली हॅट्ट्रिक लावणारा पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो याने पुन्हा आपण मैदानाबाहेरही हिरो असल्याचे सिद्ध केले आहे. स्पेनविरुद्ध मॅचनंतर परतताना एक चिमुरडा फॅन रोनाल्डोची एक झलक पाहण्यासाठी अक्षरशः रडत होता. त्यावेळी रोनाल्डोने बसमधून उतरून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे मन जिंकले आहे.


  छोट्या फॅनला अडवत होते सुरक्षारक्षक...
  - व्हिडिओमध्ये दिसून येते की पोर्तुगालचे खेळाडू मॅचनंतर हॉटेलच्या दिशेने जात होते. स्टेडिअमबाहेर उभ्या असलेल्या बसमध्ये एक-एक करून सगळे बसत होते. त्यामध्ये कॅप्टन रोनाल्डोचा देखील समावेश होता. कुठल्याही फॅनने खेळाडूंच्या जवळ येऊ नये याची खबरदारी सुरक्षा रक्षकांनी घेतली होती.
  - त्याचवेळी एक लहान मुलगा आपल्या आईसोबत उभा होता. त्याने कुठल्याही परिस्थितीत आपला आवडता फुटबॉलर रोनाल्डोची भेट घेणार असा हट्ट धरला होता. सुरक्षा रक्षकांनी अडवले तेव्हा त्याला रडू कोसळले. रोनाल्डोची नजर त्या मुलावर गेली आणि त्याला राहावले नाही. तो बसमधून खाली उतरला.
  - रोनाल्डोने त्या मुलाला आपल्या जवळ बोलावले आणि घट्ट मिठी दिली. यावर तो छोटुसा फॅन पुन्हा रडला, पण यावेळी त्याचे अश्रू आनंदाचे होते. रोनाल्डोने त्याला मिठी देत किस केले आणि त्याच्या आईला सुद्धा बोलावून फोटो काढले. त्या मुलाने रोनाल्डोच्या नावाची जर्सी घातली होती. यावेळी त्या मुलाचे आनंद सामावेनासे झाले होते.

  पुढे पाहा, रोनाल्डो आणि त्याच्या फॅनचा तो व्हिडिओ...

Trending