Home | Sports | Football | Female Sports Reporter Kissed And Groped During Live Telecast Of FIFA World Cup

Live रिपोर्टिंग करणाऱ्या महिला पत्रकाराची छेड; अश्लील टच, किस करून निघून गेला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 21, 2018, 06:37 PM IST

हा प्रसंग लाइव्ह कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यावर सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे.

 • Female Sports Reporter Kissed And Groped During Live Telecast Of FIFA World Cup

  स्पोर्ट्स डेस्क - रशियात सुरू असलेल्या FIFA फुटबॉल वर्ल्ड कप दरम्यान एका घटनेवर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी मैदानाबाहेर लाइव्ह रिपोर्टिंग सुरू असताना एका महिलेची छेड काढण्यात आली आहे. हा प्रसंग लाइव्ह कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यावर सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे. जुलिएथ असे या महिला रिपोर्टरचे नाव असून ती रशियातील मॉस्को येथे रिपोर्टिंग करत होती. त्याचवेळी एका व्यक्तीने अचानक येऊन तिच्या स्तनांना हात लावला आणि किस करून निघून गेला.


  काय म्हणाली जुलिएथ...
  - जुलिएथ एका फुटबॉल मैदानाबाहेर थांबून लाइव्ह रिपोर्टिंग करत होती. या थेट प्रक्षेपणात ती स्टुडिओत बसलेल्या अँकरशी चर्चा करत होती. त्याचवेळी अचानक एका व्यक्तीने येऊन तिच्या छातीवर हात लावला, तिला पकडून किस केले आणि निघून गेला.
  - अनपेक्षित घडलेल्या या घटनेवर ती एका सेकंदासाठी स्तब्ध झाली. परंतु, आपण On Air असल्याचे भान ठेवून तिने रिपोर्टिंग थांबवली नाही. थेट प्रक्षेपण संपल्यानंतर तिने आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला.
  - ती म्हणाली, "आमची सुद्धा काही मूल्य आहे. बरोबरीचा अधिकार आम्हालाही आहे. आम्ही अशा प्रकारच्या वागणुकीच्या लायकीचे आहोत का?" ती पुढे सांगते, "मी त्या ठिकाणी दोन तास परिस्थितीचा आढावा घेत होते. लाइव्ह रिपोर्टिंग करण्यापूर्वी रिहर्सल सुद्धा केले होते. तो त्याच ठिकाणी थांबला होता. एकदा लाइव्ह गेल्या मी थांबणार नाही असे त्याला कळाले होते. त्याचाच गैरफायदा त्याने घेतला."
  - लाइव्ह संपताच तिने त्या माणसाचा शोध सुरू केला. परंतु, आजूबाजूला पाहूनही तो सापडला नाही. साहजिकच तो घटनास्थळावरून निघून गेला होता. ती ज्या चॅनलसाठी काम करत होती त्या डीडब्लू स्पोर्ट्सने सुद्धा या घटनेचा निषेध केला.
  - यानंतर सोशल मीडियावर त्या व्यक्तीच्या विरोधात संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया सुरू झाल्या. त्यावेळी स्टुडिओत अँकरिंग करत असलेल्या महिलेने सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. तिच्या मते, याला फक्त एक किस म्हणताच येणार नाही. तो अचानक केलेला सेक्स अटॅक होता. अनेकांनी त्या व्यक्तीविरोधात कारवाईची सुद्धा मागणी केली.


  पुढील स्लाइड्सवर, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

 • Female Sports Reporter Kissed And Groped During Live Telecast Of FIFA World Cup

Trending