फुटबॉल स्टार रोनाल्डोच्या / फुटबॉल स्टार रोनाल्डोच्या डोक्याला दुखापत, तरीही जखमेपेक्षा LOOKS ची चिंता

दिव्य मराठी वेब टीम

Jan 22,2018 05:31:00 PM IST

स्पोर्ट्स डेस्क - रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो रविवारी झालेल्या स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये जखमी झाला. पण, त्याच्या या जखमापेक्षा जास्त त्याच्या स्टाइलचीच चर्चा आहे. त्याने चक्क उपचारासाठी आलेल्या डॉक्टरचा स्मार्टफोन हातातून घेतला. तसेच आपल्याला लागलेल्या जखमेमुळे Look तर बिघडला नाही ना, याची खात्री करून घेतली असा आरोप सोशल मीडियावर लावला जात आहे. लोक त्याला ट्रोल करत आहेत.

असा झाला जखमी...
Deportivo La Coruna विरोधात आपले दुसरो गोल करताना ही घटना घडली. समोरच्या संघातील फुटबॉलरने ज्या फुटबॉलला फ्लाइंग किक मारण्याचा प्रयत्न केला, त्याच बॉलवर हेडर मारून रोनाल्डोने यशस्वीरीत्या गोल केले. मात्र, या दरम्यान त्या फुटबॉलरचा शूज रोनाल्डोचे डोके स्पर्श करून गेला आणि तो जखमी झाला. या सामन्यात Deportivo La Coruna संघाविरोधात त्याच्या टीमने 7-1 ने विजय मिळवला.

पुढील स्लाइड्सवर फोटोंमध्ये पाहा संपूर्ण घटना आणि लोकांनी त्याला असे केले ट्रोल...

X
COMMENT