आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA: दिग्गज म्हणवून घेणारे संघ पडले; आता हे संघ आहेत वर्ल्ड कपचे दावेदार, जाणू घ्या का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - रशियात 14 जूनला सुरू झालेल्या फीफा वर्ल्ड कपचा निम्मा प्रवास संपुष्टात आला आहे. यात मी-मी म्हणवून घेणारे मोठ-मोठे संघ बाहेर पडले आहेत. तर काही संघ यावेळी क्वालिफाय सुद्धा करू शकले नाहीत. फीफा वर्ल्ड रँकिंगमध्ये सर्वश्रेष्ठ 20 च्या यादीत असलेले 10 संघ बाहेर आहेत. त्यापैकी 5 संघ आपली लाज वाचवू शकले. तरीही तब्बल 4 वेळा फीफा वर्ल्डकप घेणारा इटली यावेळी क्वालिफाय करू शकला नाही. अशा भल्या-भल्या संघांना यावेळी छोट्या संघांनी टक्कर दिली आहे. त्यामुळेच 4 वेळा जगज्जेता ठरलेला जगातील क्रमांक एकचा फुटबॉल संघ जर्मनी सुद्धा ग्रुप स्टेजमध्ये नाही. यावेळी मेसी आणि रोनाल्डो सुद्धा आपल्या संघांसाठी काहीच करू शकले नाहीत. अशात कोण आहे 2018 च्या फीफा वर्ल्ड कपचा दावेदार असा प्रश्न पडला आहे. 


असे झाले टॉप संघांचे हाल...
चौथ्या क्रमांकावर असलेला पोर्तुगाल आणि पाचव्या क्रमांकावर असलेला अर्जेंटिना सुद्धा आऊट आहे. सोबतच आठव्या क्रमांकावर असलेल्या पोलंड आणि त्यानंतर स्पेनची जादू सुद्धा यावेळी फिकी पडली. 11 व्या क्रमांकावर असलेला पेरू, त्यानंतर क्रमशः डेनमार्क, मेक्सिको, कोलंबिया, कोस्टा रिका हे टॉप 20 तील संघ सुद्धा टिकू शकले नाहीत. 


हे आहेत टॉप-8
जगात दुसऱ्या क्रमांकाचा आणि 5 वेळा वर्ल्ड कप जिंकणारा संघ ब्राझीलने उप-उपांत्य फेरीत जागा निश्चित केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला बेल्जियम, सहाव्या क्रमांकावर असलेला स्वित्झरलंड, सातव्या क्रमांकावरील फ्रान्स, 13 व्या क्रमांकाचा इंग्लंड आणि 14 व्या क्रमांकावरील उरुग्वे हे संघ आता टॉप 8 मध्ये पोहोचले आहेत. टीम स्टार फुटबॉलपटू नाही तर एक संघ भावनेने बनत असते हे या खेळाडूंनी सिद्ध करून दाखवले आहे.

 

क्वालिफाय देखील करू शकले नाहीत हे संघ
टूर्नामेंटमध्ये 4 वेळा विजेता ठरलेला इटली, नेदरलंड, चिली, अमेरिका आणि घाना अशा संघांनी यावेळी क्वालिफाय सुद्धा केले नाही. क्वालिफाय केले तरीही त्यांना सुद्धा छोट्या संघांकडून बड्या आव्हानांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे अधिक होती. कारण आतापर्यंत मोठ्या संघांकडून समर्थकांच्या हाती फक्त निराशा लागली आहे. 


ब्राझीलकडून मोठ्या अपेक्षा
पाच वेळा विश्वविजेता राहिलेला ब्राझील सध्या फीफा क्वार्टर फायनलमध्ये आहे. त्यामुळे, जगभरातील फुटबॉल प्रेमींच्या नजरा ब्राझीलकडे वळल्या आहेत. प्री क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलला पोहोचवण्यात नेमरने जबरदस्त कामगिरी केली आहे. 1994 मध्ये या टीमने वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी संघ नंबर एकवर आला. यानंतर 2002 मध्ये ब्राझीलच्या टीमने पुन्हा वर्ल्डकप उचलला आणि नंबर एकचे स्थान मिळवले. चालू फीफामध्ये त्यांचे प्रदर्शन पाहता, त्यांच्याकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...