भारताला विजयाची संधी, / भारताला विजयाची संधी, तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाच्या १ बाद २३ धावा

वृत्तसंस्था

Aug 15,2015 04:02:00 AM IST
गाले - फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला स्वातंत्र्यदिनी यजमान श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसाेटीत शानदार विजयाची संधी अाहे. यासाठी भारताच्या फलंदाजांकडून उल्लेखनीय खेळीची अाशा अाहे. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ३६७ धावा काढल्या. या वेळी श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शुक्रवारी तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २३ धावा काढल्या. शिखर धवन (१३) अाणि ईशांत शर्मा (५) मैदानावर खेळत अाहेत. १५३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताकडे अद्याप ९ विकेट शिल्लक अाहेत.

यष्टिरक्षक दिनेश चांदिमलच्या नाबाद १६२ धावांच्या बळावर श्रीलंकेला डाव सावरता अाला. तसेच यजमान टीमने पराभवाचे सावटही दूर सारले. एकाकी झंुज देताना त्याने संघाला दुसऱ्या डावात ३६७ धावांपर्यंतचा पल्ला गाठून दिला. त्यामुळे भारताला अाता विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य गाठावे लागणार अाहे. भारताचा सलामीवीर लाेकेश राहुल (५) सपशेल अपयशी ठरला. श्रीलंकेचा दिनेश चांदिमल, भारताचा अजिंक्य रहाणे अाणि अार. अश्विन या तिघांनी शुक्रवारी सामन्याचा तिसरा दिवस गाजवला. चांदिमलने शानदार शतकी खेळी केली. रहाणेने सर्वाधिक अाठ झेल घेण्याच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. अार. अश्विनने सामन्यात दहा विकेट घेतल्या.
अश्विनने घेतले दहा बळी
नुवान प्रदीपला त्रिफळाचीत करून अार. अश्विनने चाैथी विकेट व कसाेटीत दहावा बळी घेतला. अश्विनसह अमित मिश्रानेही शानदार गाेलंदाजी केली. त्याने १७ षटकांत ६१ धावा देत तीन विकेट घेतल्या. अाॅफस्पिनर हरभजनसिंग, ईशांत शर्मा अाणि वरुण अॅराेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
धावफलक
श्रीलंका पहिला डाव १८३. भारत पहिला डाव ३७५.
श्रीलंका दुसरा डाव धावा चेंडू ४ ६
करुणारत्ने त्रि. गो. अश्विन ०० ०५ ० ०
सिल्वा त्रि. गो. अमित मिश्रा ०० ०६ ० ०
प्रसाद झे. रहाणे गो. अॅरोन ०३ १२ ० ०
संगकारा झे. रहाणे गो. अश्विन ४० ७० ५ ०
मॅथ्युज झे. राहुल गो. मिश्रा ३९ ६३ ४ १
चंदीमल नाबाद १६२ १६९ १९ ४
थिरिमाने झे. रहाणे गो. अश्विन ४४ ७६ ४ ०
मुबारक झे. रहाणे गो. हरभजन ४९ ६० ४ २
हेराथ झे. रहाणे गो. मिश्रा ०१ १५ ० ०
कुशल झे. शहा गो. इशांत ०७ २२ १ ०
प्रदीप त्रि. गो. अश्विन ०३ ०४ ० ०
अवांतर : १९. एकूण : ८२.२ षटकांत सर्वबाद ३६७ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-०, २-१,३-५, ४-९२, ५-९५, ६-२२०, ७-३०२, ८-३१९, ९-३६०, १०-३६७.
गोलंदाजी : अश्विन २८.२-६-११४-४, अमित मिश्रा १७-२-६१-३, हरभजन १७-०-७३-१, वरूण अॅरोन ७-०-३९-१, इशांत शर्मा १३-०-७७-१.

भारत दुसरा डाव धावा चेंडू ४ ६
राहुल पायचित गो. हेराथ ०५ १४ ० ०
शिखर धवन नाबाद १३ २६ २ ०
ईशांत शर्मा नाबाद ०५ ०८ १ ०
अवांतर : ००. एकूण : ८ षटकांत १ बाद २३ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१२. गोलंदाजी : प्रसाद २-१-२-०, हेराथ ३-०-१३-१, कुशल ३-१-८-०.
X
COMMENT