आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ind vs Zim: भारताचा झिम्बाब्वेवर 83 धावांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्णधार चिगुंबरा 10 धावा काढून बाद झाला. - Divya Marathi
कर्णधार चिगुंबरा 10 धावा काढून बाद झाला.
हरारे- भारत झिम्‍बाब्‍वे तिस-या वनडेमध्‍ये टीम इंडियाने 83 धावांनी विजयावर नाव कोरले आहे. भारताने 3-0 ने आघाडी जिंकली असून केदार जाधव हा या विजयाचा शिल्‍पकार ठरला आहे. स्टुअर्ट बिन्नीने 3 विकेट्स घेतल्‍या आहेत, तर अक्षर पटेल, हरभजन सिंह, मोहित शर्मा यांनी प्रत्‍येकी दोन गड्यांना तंबूत धाडले आहे.
भारताच्‍या 277 धावांच्‍या आव्‍हानाचा पाठलाग करणे झिम्‍बॉब्‍वेसाठी चांगलेच जड ठरले. 43 व्‍या छटकातच झिम्‍बाब्‍वेचा संघ भारतीय गोलंदाजांनी बाद केला. एकटा चिभाभा (82) सोडला तर, 30 धावांपुढे एकाही फलंदाजाला मजल मारता आली नाही. त्‍याआधी 50 छटकात पाच गडी बाद 276 धावा भारतीय फलंदांजांना वेचता आल्‍या. केदार जाधव हा शतक करून नॉट आऊट राहिला, तर मनीष पांडेनेही 71 धावा केल्‍या आहेत. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचे जोरदार सुरूवात केली. भारतीय संघाने या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच आपल्या खिशात घातली आहे. पहिल्या सामन्यात अंबती रायुडूने शानदार शतक झळकावून टीम इंडियाला विजयासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. दुसर्‍या सामन्यात भुवनेश्वर कुमारने चार विकेट घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

> प्लेइंग इलेवन:
* टीम इंडिया - अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनोज तिवारी, मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, हरभजन सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा
* झिम्बाब्वे - सिकंदर रजा, हॅमिल्टन मास्कद्जा, चिगुंबरा (कर्णधार), चिभाभा, मुतुंबमी, क्रेमर, त्रिपानो, पनियांगारा. उत्सेया, वाल्लर, चकाब्वा.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, Ind vs Zim सामन्याचे फोटो...