आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाज सेमीफायनलमध्ये रोनाल्डोसमोर गॅरेथ बेल, रंगणार पोर्तुगाल वि. वेल्सची झुंज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिओन - युरो कप फुटबॉल स्पर्धेचे पहिले सेमीफायनल बुधवारी रात्री पोर्तुगाल वि. वेल्स यांच्यात खेळवले जाईल. पोर्तुगालची टीम २००४ नंतर प्रथमच युरो चषकाच्या फायनलमध्ये खेळण्याच्या लक्ष्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे वेल्सची टीम कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदा सेमीफायनलचा सामना खेळेल. हा सामना म्हणजे पोर्तुगालचा “क्रिस्टियानो रोनाल्डो वि. गॅरेथ बेल’ असा होणार असल्याचे चित्र आहे. हे दोघेही जगातील दिग्गज खेळाडू आहेत. दोघेही फुटबॉल क्लब रिअल माद्रिदकडून खेळतात. युरो कपमध्ये दोघेही आपापल्या संघाकडे अव्वल गोल स्कोअरर आहेत. बेलने आतापर्यंत ३, तर रोनाल्डोने २ गोल केले आहेत.

पोर्तुगालने २००० पासून आतापर्यंत पाच युरो कपमध्ये सेमीफायनल प्रवेश केला आहे. २००४ मध्ये फक्त एकवेळ पोर्तुगालने अंतिम चारचा अडथळा दूर केला होता. त्या वेळी पोर्तुगालच यजमान होते. या स्पर्धेत पोर्तुगालने एकही सामना ९० मिनिटांत जिंकलेला नाही. असे असले तरीही कोच फर्नांडो सांतोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्तुगाल मागच्या १२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत अजेय ठरली आहे. रोनाल्डोचा रिअल माद्रिदचा सहकारी पेपे मार्शलिंगच्या उपस्थितीत त्यांची सुरक्षा फळी मजबूत झाली आहे. हेच त्यांचे शक्तिस्थान आहे. पोर्तुगालसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांची विरोधी टीम वेल्सचा मिडफील्डर अॅरोन रॅमसी या सामन्यात खेळू शकणार नाही. निलंबनामुळे तो सेमीत खेळू शकणार नाही.

दुसरीकडे वेल्सची टीम ५८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये खेळेल. वेल्सची टीमसुद्धा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. किताबासाठी प्रबळ दावेदार असलेल्या बेल्जियमसारख्या मजबूत संघाविरुद्ध वेल्सचा विजय सर्वाधिक शानदार मानला जात आहे. गॅरेथ बेल हा वेल्सचा जादुई खेळाडू आहे. साखळीत त्याने तीन वेळा गोल करून वेल्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. राउंड ऑफ १६ आणि क्वार्टर फायनल सामन्यातही बेलने आपल्या संघाला चार वेळा गोल करण्यात महत्त्वपूर्ण मदत केली.
संघाची आकडेवारी
पोर्तुगाल वि. वेल्स
०५ सामने ०५
०६ गोल केले १०
०५ गोल स्वीकारले ०४
९५ अटेम्प्ट ५९
३०% अटेम्प्ट ऑन टार्गेट २९%
५४% बॉल पोझिशन ४७%
८७% यशस्वी पास ८३%
बातम्या आणखी आहेत...