फिफा अंडर-17 वर्ल्डकप: / फिफा अंडर-17 वर्ल्डकप: इंग्लंड, स्पेनची फायनलमध्ये धडक; ब्राझील, माली बाहेर

एकनाथ पाठक

Oct 26,2017 02:22:00 AM IST
मुंबई - तीन वेळच्या युराे चॅम्पियन स्पेनच्या युवांनी चमत्कारी कामगिरीच्या बळावर गत उपविजेत्या मालीच्या गळ्यात पराभवाची माळ घातली. स्पेनने बुधवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवरील उपांत्य सामन्यात ३-१ अशा फरकाने सनसनाटी विजयाची नाेंद केली. सुपरस्टार रुईझ अबेल (१९, ४३ वा मि.) अाणि फराण टाेरेस (७१ वा मि.) यांच्या सरस खेळीच्या बळावर स्पेनने सामना जिंकला. गत उपविजेत्या मालीकडून नादियाला (७४ वा मि.) एकमेव गाेल करता आला, इतर खेळाडू कमी पडले. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही.

यासह स्पेनच्या युवांनी अापल्या फुटबाॅल करिअरमध्ये फिफाच्या १७ वर्षांखालील फुटबाॅल वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली. अाता स्पेनची वर्ल्डकप ट्राॅफीसाठीची अंतिम लढत इंग्लंडशी हाेईल. मालीच्या युवांनी सामन्यात गाेल करण्याच्या अनेक संधी हुकवल्या. याचाच फायदा घेताना स्पेनच्या संघाने सामन्यात बाजी मारली. दमदार खेळी करताना स्पेनने १९ व्या मिनिटाला सामन्यात अाघाडी मिळवली. रुईझने गाेलचे खाते उघडताना स्पेनला सामन्यावर मजबूत पकड मिळवून दिली. त्यानंतर त्याने ४३ व्या मिनिटाला पेनल्टी काॅर्नरवर सुपर गाेल करून अाघाडीला २-० ने मजबूत केले. मालीचा स्पेनला राेखण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.

टिका-टिकासमाेर माली फेले
जवळ-जवळ चेंडू पास करण्याच्या अापल्या ‘टिका-टिका’ या खास शैलीदार खेळीच्या बळावर स्पेन सामन्यात शेवटपर्यंत वर्चस्व राखले. याच खुबीदार खेळीमुळे गत विजेत्या मालीचा टिकाव लागला नाही. प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंना हुलकावणी देऊन चेंडू ताब्यात घेण्याच्या प्रयत्नातच मालीच्या युवांची माेठी दमछाक झाली. याचाच फायदा घेताना स्पेनच्या युवांनी दुसरीकडे सामन्यात गाेलचा सपाटा सुरू ठेवला. त्यामुळे मालीला समाधानकारक खेळी करता अाली नाही.
मुंबईकरांनी उंचावला युवांचा अात्मविश्वास :
तमाम मुंबईकरांनी डी. वाय. पाटील स्टेडियमवरील सामन्यात फायनलमधील प्रवेशासाठी झुंजणाऱ्या स्पेन अाणि मालीच्या युवांचा अात्मविश्वास उंचावला. वेळाेवेळीे दाेन्ही टीमला पाठबळ देत मुंबईकरांनी अापल्यातल्या उदारपणाचा प्रत्यय अाणून दिला. या वेळी दाेन्ही संघ अापलेच असल्याची भावनाही चाहत्यांनी यादरम्यान दाखवून दिली.

शनिवारी काेलकात्यात फायनल : येत्या शनिवारी २८ अाॅक्टाेबर राेजी फुटबाॅल वर्ल्डकप ट्राॅफीवर नाव काेरण्यासाठी उत्सुक असणारा इंग्लंड अाणि स्पेन यांच्यात फायनल मुकाबला हाेणार अाहे,. या दाेन्ही संघांनी प्रथमच फिफा वर्ल्डकपची फायनल गाठली अाहे.
चाैथ्या किताबाचे स्वप्न भंगले
तीन वेळच्या चॅम्पियन ब्राझिलियन युवांचे चाैथ्यांदा किताब जिंकण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे या युवांना तिसऱ्या स्थानासाठी अाता झुंज द्यावी लागेल. अातापर्यंतचा वर्ल्डकपमधील सर्वात प्रबळ मजबूत संघ म्हणून ब्राझीलकडे पाहिले जात हाेते. मात्र, इंग्लंडच्या युवांनी ब्राझिलियनचे अाव्हान माेडीत काढण्याचा पराक्रम गाजवला.
इंग्लंडचा ब्राझीलला दे धक्का
कोलकाता- रियान ब्रुस्टरच्या सलग दुसऱ्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इंग्लंडने तीन वेळेचा माजी चॅम्पियन ब्राझील संघाला बुधवारी ३-१ गोलने पराभवाचा धक्का देत फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करत ऐतिहासिक कामगिरी केली.
विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर इंग्लंडने स्पर्धेतील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या ब्राझीलला स्पर्धेबाहेर केले. इंग्लंडसाठी ब्रुस्टरने ब्राझीलचा भक्कम बचाव भेदत सलग ३ गोल डागले. ब्रुस्टरने १० व्या, ३९ व्या आणि ७७ व्या मिनिटाला शानदार मैदानी गोल केले. त्याचे स्पर्धेत एकूण ७ गोल झाले आहेत. आता तो गोल्डन शूजचा प्रबळ दावेदार बनला आहे. ब्राझीलकडून वेस्लीने २१ व्या मिनिटाला गोल केला. आता २८ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध स्पेन यांच्यात अंतिम सामना कोलकाता येथे होईल.
X
COMMENT