आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी लोक पाहणार भारत-पाक सामना; बीजिंग ऑलिम्पिकहून अधिक प्रेक्षक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरीजमधील पहिला सामना भारत-पाकिस्तान दरम्यान झाला होता. टीव्हीवर 20 कोटी लोकांनी तो पाहिला. - Divya Marathi
सीरीजमधील पहिला सामना भारत-पाकिस्तान दरम्यान झाला होता. टीव्हीवर 20 कोटी लोकांनी तो पाहिला.
स्‍पोर्ट डेस्‍क- क्रिकेटसंबंधी संस्थांनुसार, भारत-पाकिस्तान ही रविवारी होत असलेली चॅम्पियन्स ट्राॅफीतील अंतिम लढत जगातील १२.५% लोकसंख्या म्हणजे सुमारे १०० कोटी लोक पाहतील. हे खरे ठरलेच तर सर्वाधिक लोकांनी पाहिलेला हा पहिला सामना ठरेल. बीजिंग ऑलिम्पिक उद्घाटन साेहळाही इतक्या लोकांनी पाहिला नव्हता.
 
- २०११ वर्ल्डकपमध्ये भारत-पाक उपांत्य लढत ९८ काेटी लोकांनी पाहिली. आजवरचा तसा सर्वाधिक लोकांनी पाहिलेला सामना होता.
- या स्पर्धेत ४ जून रोजीचा भारत-पाक सामना ३२.४० कोटी लोकांनी पाहिला.
- आयपीएलच्या ६० सामन्यांचे एकूण ४१ कोटी प्रेक्षक असतात. क्रिकेट वर्ल्डकपच्या प्रत्येक सामन्याला १५ कोटी प्रेक्षक मिळतात.
 
महसूल : जाहिरात दर १० पट वाढला, ३० सेकंदांचे १ कोटी
- स्पर्धेमध्ये आतापर्यंत ३० सेकंदांचा अॅड स्लॉट १० लाख रु.चा होता. मात्र, भारत-पाक सामन्यासाठी ३० सेकंदांचा स्लॉट १ कोटी रुपयांचा झाला आहे.
- लंडनचे ९० %  पेक्षा जास्त टीव्ही स्पॉट बुक झाले आहेत. ते निस्सान मोटर, इंटेल कॉर्प, एमिराइट्स, ओप्पो आणि एमआरएफने बुक केले आहेत. उर्वरित १० % स्लॉटमधून २० कोटींची कमाई होईल.

- थेट प्रक्षेपण : दुपारी ३ वाजेपासून स्टार स्पोर्ट्सवर.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या क्रिडाप्रकाराला किती आहेत प्रेक्षक...
 
बातम्या आणखी आहेत...