आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा ‘विराट’ विजय; श्रीलंकेवर 9 गड्यांनी मात, शिखर धवनचे वेगवान शतक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाम्बुला - कसाेटी मालिका विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या टीम इंडियाने रविवारी वनडे सिरीज जिंकण्याच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली.शिखर धवनच्या (नाबाद १३२) वेगवान शतकाच्या बळावर पाहुण्या भारतीय संघाने यंदाच्या सत्रात सर्वात माेठा विजय संपादन केला. भारताने सलामीच्या वनडेत २८.५ षटकांत यजमान श्रीलंकेवर ९ गड्यांनी मात केली. यासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा वनडे २४ अाॅगस्ट राेजी पल्लेकलच्या मैदानावर हाेणार अाहे.  
 
अक्षर पटेल (३/३४), केदार जाधव (२/२६), यजुवेंद्र चहल (२/६०) अाणि जसप्रीत बुमराह (२/२२) यांनी धारदार गाेलंदाजी करताना प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान श्रीलंकेला ४३.२ षटकांत २१६ धावांमध्ये राेखले. प्रत्युत्तरात भारताने काेहली-सामनावीर धवनच्या भागीदारीच्या बळावर सामना जिंकला. शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.   
 
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या यजमान श्रीलंकेने दमदार सुुरुवात केली. डिकवेला (६४) अाणि गुणथिलकाने (३५) शानदार खेळी करताना संघाला ७४ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान यजुवेंद्रने ही जाेडी फाेडली. त्याने गुणथिलकाला बाद करून टीम इंडियाला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर केदार जाधवने डिकवेलाला पायचीत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डिकवेलाने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने ७४ चेंडूंचा सामना करताना ८ चाैकारांच्या अाधारे ६४ धावांची खेळी केली. त्याने एकाकी झंुज देताना संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, त्यालाही फार काळ मैदानावर  अाव्हान टिकवून ठेवता अाले नाही. त्याची खेळी संघासाठी महत्त्वाची ठरली. त्यानंतर मॅथ्यूजने नाबाद ३६ धावांचे याेगदान दिले. दरम्यान, भारताच्या युवा खेळाडूंच्या धारदार गाेलंदाजीपुढे यजमानांच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. कर्णधार थरंगा १३ धावांची खेळी करून तंबूत परतला.   

शिखर धवनचे ७१ चेंडूंमध्ये शतक
शिखर धवनने वनडे करिअरमधील ११ वे शतक साजरे केले. त्याने ९० चेंडूंत २० चाैकार अाणि ३ षटकारांच्या  अाधारे नाबाद १३२ धावांची खेळी केली. त्याने ७१ चेंडूंमध्ये अापले शतक केले. यापूर्वी त्याने विंडीजविरुद्ध ७३ चेंडूंत शतक ठाेकले हाेते.

काेहली-धवनची विजयी भागीदारी
शिखर धवनने टीमच्या कर्णधार विराट काेहलीसाेबत तुफानी फटकेबाजी केली. यासह त्यांनी टीम इंडियासाठी अभेद्य १९७ धावांची विजयी भागीदारी रचली. यात काेहलीने नाबाद ८२ धावांचे याेगदान दिले. त्याने ७० चेंडूंत १० चाैकार अाणि एका षटकारासह ही खेळी केली.

माेठा विजय; भारत एकमेव
यंदाच्या सत्रामध्ये गडी अाणि चेंडूंत माेठ्या अंतराने विराट विजय संपादन करणारा भारत हा या वर्षी एकमेव संघ ठरला. भारताने २८.५ षटकांत ९ गडी राखून सामना जिंकला. यापूर्वी भारताने गत जुनमध्ये बांगलादेशवर ४१ षटकांत ९ गड्यांनी मात केली हाेती.

अक्षर पटेल चमकला
टीम इंडियाचा युवा गाेलंदाज अक्षर पटेल सलामीच्या वनडेत सामन्यात चमकला. त्याने यजमानांविरुद्ध धारदार गाेलंदाजी करताना तीन गडी बाद केले. त्याने १० षटकांत ३४ धावा देताना हे यश संपादन केले. त्यापाठाेपाठ यजुवेंद्र चहल, केदार जाधव अाणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दाेन गडी बाद केले. त्यामुळे श्रीलंकेला झटपट गाशा गुंडाळावा लागला.  
 
पुढील स्‍लाइडवर...धावफलक...
बातम्या आणखी आहेत...