आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • LIVE South Africa Tour Of India, 1st Test Day 2nd: India V South Africa At Mohali, Nov 6

IND vs SA: चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक, टीम इंडियाची 142 धावांनी आघाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - मोहाली कसोटीच्‍या दुस-या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरोधात टीम इंडियाने दुस-या डावात 2 गड्यांच्‍या मोबदल्‍यात 114 धावा काढल्‍या आहेत. भारताची आघाडी 100 धावांपेक्षा अधिक झाली आहे. भारताला शिखर धवनच्‍या रूपात पहिला झटका बसला. फिलांडरने त्‍याला डिव्‍हिलियर्सच्‍या हातून झेलबाद केले. पहिल्‍या डावाप्रमाणेच या डावातही तो खाते उघडू शकला नाही.
दुस-या डावामध्‍ये भारत..
फलंदाज असे झाले आऊट धावा बॉल 4 6
मुरली विजय झेलबाद - बवुमा, बॉलर - इम्रान ताहिर 47 105 6 0
शिखर धवन झेलबाद - डिविलियर्स, बॉलर - फिलांडर 0 8 0 0
चेतेश्वर पुजारा not out 55 97 6 0
विराट कोहली not out 8 20 1 0
आफ्रिका 184 धावांवर सर्वबाद
आधी आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि अमित मिश्राच्‍या घातक गोलंदाजीच्‍या जोरावर भारताने आफ्रिकेला 184 धावांवर बाद केले आहे. डिव्‍हिलियर्स सर्वाधिक 63 धावा काढून बाद झाला आहे. कर्णधार हाशिम अमला 43 धावांची भागिदारी करू शकला. अश्विनने 51 धावा देऊन 5 गडी बाद केले. रवींद्र जडेजाने 55 धावा देऊन तिघांना बाद केले. अमित मिश्रानेही दोन गडी बाद करून 35 धावा दिल्‍या.
दक्षिण आफ्रिकेने उपहारापर्यंत 5 गड्यांच्‍या मोबदल्‍यात 127 धावा केल्‍या होत्‍या. पहिल्‍या डावात दोन गडी बाद झाल्‍यानंतर आफ्रिकेने सावध खेळण्‍यास सुरूवात केली. मात्र, आर. अश्विनच्या फिरकीने आफ्रिकेच्‍या तिघांना तंबूत पाठवले. डीम एल्गर (धावा-37), हाशिम अमला (धावा 43) आणि डीजे विलास ( 1 धाव) अशा तिघांचे बळी अश्‍विनने मिळवले आहेत. उपहारानंतरही भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकेचे खेळाडू टिकू शकले नाहीत.
टीम इंडियाच्या 201 धावा, एल्गरने केले 4 गडी बाद
नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी उतरलेल्‍या भारताने खराब सुरूवात केली. आफ्रिकेविरोधातील पहिल्‍या डावात भारताने 201 धावा बनवल्‍या. टीम इंडियासाठी मुरली विजयने सर्वाधिक 75 धावा काढल्‍या. चेतेश्वर पुजाराने 31, तर रवींद्र जडेजाने 38 धावांची भागिदारी केली. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने सर्वाधित चार गडी बाद केले. वर्नोन फिलांडर आणि इम्रान ताहिर यांनी 2-2 गडी बाद केले. रबाडा आणि हार्मर यांनी प्रत्‍येकी एक गडी टिपला.
28 धावांवर 2 गडी बाद
पहिल्‍या दिवसाचा डाव संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 2 गडी गमावून 28 धावा काढल्‍या होत्‍या. पहिल्‍या इनिंगमध्‍ये आफ्रिकेची सुरूवात खराब झाली होती. वान जिलच्‍या रूपात या संघाला पहिला झटका बसला. आर. अश्विनने 5 धावांवर त्‍याला बाद केले. त्‍यानंतर प्लेसिस याला जडेजाने भोपळाही फोडू दिला नाही.
आफ्रिकेच्‍या धावा
फलंदाज असे झाले बाद धावा बॉल 4 6
डीन एल्गर झेलबाद - जडेजा, बॉलर - अश्विन 37 123 2 0
वान जिल lbw बॉलर - अश्विन 5 23 1 0
प्लेसिस बोल्‍ड - जडेजा 0 4 0 0
हाशिम अमला झेलबाद - साहा, बॉलर- अश्विन 43 97 6 0
एबी डिव्‍हिलियर्स बोल्‍ड - अमित मिश्रा 63 83 6 0
विलास झेलबाद - जडेजा, बॉलर - अश्विन 1 3 0 0
फिलांडर झेलबाद - रहाणे, बॉलर -जडेजा 3 27 0 0
हार्मर lbw b अमित मिश्रा 7 25 0 0
डेल स्टेन स्टम्प साहा 6 14 1 0
रबाडा not out 1 3 0 0
इमरान ताहिर झेलबाद - पुजारा, बॉलर- अश्विन 4 7 1 0
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, सामन्‍याचे फोटो..